• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • फक्त हार्ट, फुफ्फुस नाही तर लिव्हरही ठेवा सुदृढ; यकृताची ताकद वाढवणारे 5 Superfood

फक्त हार्ट, फुफ्फुस नाही तर लिव्हरही ठेवा सुदृढ; यकृताची ताकद वाढवणारे 5 Superfood

यकृतातील बिघाड लक्षात येईपर्यंत खुप नुकसान झालेलं असतं.

यकृतातील बिघाड लक्षात येईपर्यंत खुप नुकसान झालेलं असतं.

लिव्हर (Liver) हा असा अवयव आहे, जो अविरतपणे काम करत राहतो. यात झालेला किरकोळ बिघाड (Minor Damage) दिसून येत नाही.

  • Share this:
    मुंबई, 26, जून : यकृत (Liver) शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातल्या अनेक प्रक्रियांवर यकृताचं नियंत्रण (Liverअसतं. पचनक्रियेत यकृताची महत्त्वाची भूमिका असते. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात (Boost Immunity) मदत करतं. शरीरात साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठवणं, जीवनसत्त्वं, आयर्न, क्षार साठवणं ही कामं यकृत करतं. लिव्हर हा असा अवयव आहे जो अविरतपणे काम करत राहतो. यात झालेला किरकोळ बिघाड दिसून येत नाही. त्यामुळे सहसा यकृतातील बिघाड लक्षात येईपर्यंत खुप नुकसान झालेलं असतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलेली लाईफस्टाईल यामुळे लिव्हरवर दबाव वाढतो. यामुळे विषारी पदार्थ आणि फॅटवर योग्यप्रकारे प्रक्रिया होत नाही. या कारणाने लठ्ठपणा, हृदय रोग, थकवा, डोकेदुखी, पचनक्रिया बिघडणं, अॅलर्जी आणि इतरही समस्या होतात. अशावेळी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतं. ('या' खेळाडूंनी 12 वी नंतर सोडलं शिक्षण, तर दुसरा आहे इंजिनीअर! कोण किती शिकलेला) यकृताचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर, त्यासाठी चांगली लाईफस्टाईल आणि आहार घ्यावा. त्याकरता काही पदार्थ खाल्ल्यानेही फायदा होतो. हळद लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी हळद सर्वोत्तम पदार्थांपैकी एक मानली जाते. हळद यकृत डिटोक्सिफाय करण्यास मदत करतं आणि चरबी कमी करण्याची क्षमता सुधारते. यासाठी 1 ग्लास पाण्यात एक चतुर्थांश चमचा हळद मिसळून उकळवून प्यावं. हे फायदेशीर ठरू शकतं. पपनस पपनस ही एक लिंबू वर्गीय वनस्पती आहे. रूटेसी कुळातील या वनस्पतीचं शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्झिमा आहे. याला इंग्रजीमध्ये पोमेलो म्हणतात. पपनसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि अँटिऑक्सिडंन्ट्स आढळतात जे लिव्हर क्लिनिंग प्रोसेसमध्ये मदत करतात. यात ग्लुटेथिओन नावाचं अँटिऑक्सिडंन्ट्स असतं जे फ्री रेडिकल्स निकामी करतं आणि लिव्हरला डिटॉक्सिफाय करतं. (या सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे) बीट बिटामधील काही घटक यकृतासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यामध्ये असलेलं बिटा कॅरोटीन यकृताला उत्तेजित करतं आणि त्याचं कार्य सुधारतं. यामुळे रक्ताची पातळी वाढते. लिंबू लिंबू लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. त्यातील डी-लिमोनेन नावाचं घटक यकृताच्या पेशी सक्रिय करतं. त्यामुळे यकृत स्वच्छ होण्यात मदत होते. याशिवाय लिंबू खनिजांचं शोषण होण्यात उत्तेजन देतं. म्हणून लिंबूपाणी नियमितपणे प्यायल्याने खूप फायदा होऊ शकतो. ग्रीन टी ग्रीन टी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानली जाते. शरीरात साचलेली चरबी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि यकृताला हानिकारक घटकांपासून वाचवते. एका अभ्यासानुसार, नियमितपणे ग्रीन टी पिणार्‍या लोकांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. (तुटलेली हाडं जोडणारं हनुमान मंदिर; कुठे आहे माहिती आहे?) लसूण यकृत निरोगी ठेवण्यासाठी लसूण खूप उपयुक्त मानलं जातं. शरीरात प्रवेश केल्यावर यकृतमधील एन्झाईम्स सक्रिय करते. ज्यामुळे यकृत स्वच्छ करण्यास उपयुक्त ठरतं. यकृताचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं आणि त्याची ताकद वाढवते.
    Published by:News18 Desk
    First published: