मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुटलेली हाडं जोडणारं हनुमान मंदिर; कुठे आहे माहिती आहे?

तुटलेली हाडं जोडणारं हनुमान मंदिर; कुठे आहे माहिती आहे?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपल्या काही देवस्थानांशी निगडित मोठ्या रंजक कथा असतात. हा हनुमान तुटलेली हाडं जोडतो, अशी श्रद्धा आहे. काय आहे कथा आणि कुठे आहे मंदिर?

नवी दिल्ली,22 जून : आपल्या देशात देवावर आणि धर्मावर श्रद्धा (Belief in God and Religion) ठेवणारे असंख्य लोक आहेत. देशातल्या विविध भागात काही चमत्कारीक मंदिरं आहेत. ज्याच्या कहाण्यांवर आपला विश्वासच बसत नाही. मात्र वर्षानुवर्ष श्रद्धेने भाविक (Devotee) मंदिरांमध्ये (Temple) दर्शनासाठी येतात. देवाच्या कृपेने इच्छा पूर्ण झाल्या की त्याच्या अनेक अख्यायिका सर्वदूर पसरतात. मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी जिल्ह्यातही असंच प्रसिद्ध मंदिर आहे. कटनीपासून 35 किलोमीटरवर मोहा गावात असलेलं हे हनुमानाच मंदिर ‘संकटमोटन धाम’ नावाने खुपच प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची तुटलेली हाडं (Broken Bones) जोडली जातात अशी मान्यता आहे. हाडांसंदर्भात कोणताही आजार इथे बरा होतो असं बोललं जातं. मात्र, बऱ्याचजणांना हा अंधविश्वास (Superstition) वाटतो.

हाडांचा आजार असेल तर या मंदिरात औषध दिलं जातं. त्यामुळे आजार बरा होतो असं म्हणतात. झाड पाल्यापासून बनणारं हे औषध मंदिराजवळच्या जंगलात मिळतं. मात्र,मंदिरामधून दिलं गेल तरच,फरक पडतो. त्यामुळे स्वत:हुन घेतल्यास उपयोग होत नाही.

(Vastu Tips : घरात होतात विनाकारण वाद; हे उपाय करून बघाच एकदा!)

हनुमानाच्या वाराला म्हणजे मंगळवार आणि शनिवारी भाविक इथे गर्दी करतात.

खऱ्या श्रद्धेने आणि आस्थेने औषधं घेतल तर, फरक पडतो. हे औषध देण्यासाठी खास विधी असतो. इथे आलेले श्रद्धाळू मंदिरात श्रीराम आणि देवी सीतेसाठी भजन गातात. त्यानंतर हनुमानाची आरती होते. त्यानंतर झाडपाल्याचं हे औषध दिलं जातं. महत्वाचं म्हणजे या औषधाला हात लावण्याची किंवा पहाण्याची रुग्णाला परवानगी नसते. याबरोबर दुखऱ्या जागी लावण्यासाठी तेलही दिलं जातं.

(Chanakya Niti:अहंकाराने सगळी नाती जळून जातात; चांगल्या नातेसंबंधासाठी नम्रता अंग)

अपघातात हाड तुटलं असेल तरी, फरक पडतो. या मंदिरात बसून औषध घेतलं तर, हळूहळू फरक पडतो आणि हाड जोडलं जाते अशी मान्यता आहे. पण, हे औषध घरी नेल्यास फरक पडत नाही. असं बोलतात.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Temple