सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत मास्टर ब्लास्ट फक्त १२ वी पर्यंतच शिकू शकला.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी खडगपूर रेल्वे स्थानकात तिकीट कलेक्टर म्हणून काम करायचा. धोनीने B.Com ची पदवी मिळवली आहे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी अभ्यास केला नाही आणि क्रिकेट करिअर म्हणून निवडले
भारतीय क्रिकेट संघात ODI फॉरमॅटचा उप-कर्णधार आणि ‘हिटमन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मानेही बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. रोहित हा IPLचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावावर पाच IPL ट्रॉफी आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सिंगने दिल्लीच्या जामिया मिलिया विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. सेहवाग त्याच्या बिनधास्त फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी संपादन केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने बारावी नंतर इंजीनियरिंगला ऍडमिशन घेतली, पण इंजिनीअरिंग पूर्ण करू शकला नाही आणि आपले संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले.