Home /News /lifestyle /

खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो? तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची गरज

खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो? तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची गरज

बसून काम करणारे लोक असो किंवा इतर यांपैकी अंदाजे 80% लोकसंख्येला त्यांच्या आयुष्यात एकदा तरी पाठदुखीचा अनुभव येतो. तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची गरज असल्याचे हे एक चिन्हदेखील असू शकतं.

    मुंबई, 26 जून : हल्ली बहुतेक लोकांची जीवनशैली खूप अस्थिर आणि अनियोजित आहे. ते जवळजवळ सबंध दिवस व्यस्त असतात. अशावेळी त्यांना त्यांच्या आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष देता येत नाही आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. पौष्टिक नसणाऱ्या आणि असंतुलित आहारामुळे आपल्या शरीरात बरेच प्रदूषक आणि विषारी पदार्थ जमा होतात. योग्य उपचार न केल्यास शरीरात हे विषारी पदार्थ अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अनेक लक्षणांद्वारे आपले शरीर लक्षात आणून देत असते की त्याला डिटॉक्सिफिकेशनची (Detoxification) आवश्यकता आहे. वेलनेस सेंटरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, विषारी पदार्थ असलेल्या शरीरात खालील लक्षणे दिसून येतात. बद्धकोष्ठता, अतिसार आणि इतर पचन समस्या : चांगले पचन आरोग्य ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, अतिसार इत्यादी पचनाच्या समस्यांचा त्रास होत असेल (Constipation, Diarrhea, Other Digestive Issues) तर तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या.  Weight Loss: पुरुषांनी वजन कमी करण्याचं टेन्शन सोडून द्या; फक्त या 5 सोप्या टिप्स वापरा थकवा आणि शरीरात ऊर्जेचा अभाव : शरीरात विषारी पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने झोपेची अनियमितता होऊ शकते. यामुळे सतत थकवा आणि ऊर्जेचा अभाव (Fatigue And Low Energy) जाणवतो. शरीरातील थकवा हा आणखी एक घटक आहे जो सूचित करतो की तुम्हाला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती : कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती (Weakened Immune System) असलेल्या व्यक्तीला अनेक संक्रमण होण्याची शक्यता असते. अनेक विकार रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. कमकुवत रोगप्रतिकार शक्ती हे सूचित करते की शरीराला डिटॉक्सिफिकेशनची आवश्यकता आहे. Anxiety Relief: ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा पाठदुखी : पाठदुखी (Back Pain) ही लोकांमध्ये नोंदवलेली सामान्य आरोग्य समस्यांपैकी एक आहे. अंदाजे 80% लोकसंख्येला त्यांच्या आयुष्यात एकदा तरी पाठदुखीचा अनुभव येतो. सतत पाठदुखी हे सूचित करते की शरीराला डिटॉक्सिफिकेशनची नितांत गरज आहे. संशोधनानुसार, पाठदुखीच्या अनेक रुग्णांनी ४५ दिवसांसाठी डिटॉक्स योजनेचे पालन केले. त्यानंतर या रूग्णांपैकी 76% लोकांना पाठदुखीच्या त्रासापासून पूर्ण आराम मिळाला. ब्रेन फॉग : जेव्हा तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, तुम्ही गोंधळलेले असता. अशा परिस्थितीला ब्रेन फॉग (Brain Fog) म्हणतात. या परिस्थितीत इतरांच्या तुलनेत तुम्हाला माहितीवर प्रक्रिया करण्यास सक्षम नास्ता. ब्रेन फॉग ही एक गंभीर समस्या आहे आणि जास्त कामाचा ताण, रक्तातील साखरेचे असंतुलन या समस्येला कारणीभूत ठरते. झोपेला प्राधान्य देणे आणि योग्य पोषण घेणे हे या समस्येवर उपाय ठरू शकतात.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health Tips, Immun

    पुढील बातम्या