सध्याची लाइफस्टाइल अशी झाली आहे की, मध्यरात्रीपर्यंतचा वेळ हा नेटफ्लिक्स किंवा दुसऱ्या सीरिज पाहण्यात जातो. पण सकाळच्या शिफ्टला वेळेत पोहोचणंही गरजेचं आहे. त्यामुळे जबरदस्ती उठून तुम्ही ऑफिसला तर पोहोचता पण तुमच्यातला थकवा दूर झालेला नाही. पूर्ण दिवस डोळ्यांवर झोप असल्यामुळे कामातही लक्ष लागत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला ऑफिसमध्ये राहून क्षणात थकवा दूर कसा करायचा याच्या काही टीप्स देणार आहोत. भरपूर पाणी प्या- थकवा तेव्हाच जाणवतो जेव्हा शरीरात ऊर्जा कमी होते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी भरपूर पाणी प्या. पाणी पिल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्मिती होते. स्ट्रेचिंग- ऑफिसमधील वॉशरूममध्ये जा आणि पाच मिनिटे बॉडी स्ट्रेच करा. झटपट व्यायामामुळे तुमच्या शरीरात एक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. स्ट्रेचिंगमुळे शरीरातील थकवा दूर होतो. ब्लॅक कॉफी- जेव्हा तुम्हाला भरपूर झोप येत असते तेव्हा पाण्याचा कोणताही उपाय लागू होत नाही. अशा वेळी ब्लॉक कॉफी हा उत्तम उपाय ठरतो. ब्लॉक कॉफी प्यायल्यामुळे तुमची झोप निघून जाते आणि शरीरात उर्जा निर्माण होते. मिंटच्या गोळ्या- कोणत्याही प्रकारच्या मिंट गोळ्या अथवा च्विंग गम तुमच्या जवळ असेल तर पटकन खा. यामुळे थकवा दूर होत नाही पण तुमची झोप नक्कीच पळून जाईल. मोकळ्या जागेत जा- तुम्ही काम करत असलेल्या ऑफीस परिसरात गार्डन असेल तर 5 मिनिटासाठी फिरण्यास जा. मोकळ्या आणि स्वच्छ हवेत थकवा दूर होतो. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार! तुम्हीही अती गोड खाता का, तर वेळीच व्हा सावधान नाही तर… तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन लागलंय, स्वतःचं तपासून पाहा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.