तुम्हीही अती गोड खाता का, तर वेळीच व्हा सावधान नाही तर...

तुम्हीही अती गोड खाता का, तर वेळीच व्हा सावधान नाही तर...

या आजारांबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

  • Share this:

तुम्हालाही जेवणानंतर काही गोड खाण्याची सवय आहे का.. जेवणानंतर स्वयंपाक घरात जाऊन दोन चमचे साखर खाता का... तसंच कोणत्या मिठाईच्या दुकानात गेलात तर तिकडून गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय बाहेर पडत नाहीत का... तर तुम्हाला गोड खाण्याची वाईट सवय आहे. जास्त साखर खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. या आजारांबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.

जास्त गोड खाल्ल्याने जो सर्वसामान्य आजार सुरुवातीला होतो तो म्हणजे मधुमेह. साखरेने मधुमेह होत नाही पण याचा संबंध गोड खाण्याशी नक्कीच आहे. याशिवाय साखरेने लठ्ठपणा ही वाढतो. जे मधुमेह होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

जास्त साखर खाणाऱ्यांमध्ये ट्राय- ग्लिसरसाइडची मात्रा  वाढते. तर एचडीएल कोलेस्टॉल कमी होऊ लागतं. एचडीएल हे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आणि हे हृदयाशी निगडीत आजारांना शरीरापासून दूर ठेवतं. यामुळे हे कोलेस्ट्रॉल शरीरातून कमी झालं तर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

दातांची समस्या

दातांसाठी साखर अतिसय घातक आहे. कारण यजास्त गोड किंवा साखर खाल्ल्याने बॅक्टेरिया होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे दात खराब होतात.

लीव्हरचा आजार

साखरेत असलेले फ्रक्टोज आपल्या लीव्हरसाठी चांगले नसतात. हे आपल्या लीव्हरला फॅटी बनवतात. यामुळे लीव्हरचा कॅन्सरही होऊ शकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Coconut Day- नारळाचं पाणी पिण्याचे 5 फायदे, गंभीर रोगांवर आहे रामबाण उपाय

भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या