तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार!

कमी वयातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडण्यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 03:56 PM IST

तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना केस गळतीची समस्या सतावत आहे. कमी वयातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडण्यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. या सर्वाचं मुख्य कारण आहे ते म्हणजे लाइफस्टाइल, अवेळी खाणं, अयोग्य खाणं- पिणं, केसांची योग्य निगा न राखणं. धूळ, माती आणि प्रदुषणामुळे केस कमकूवत होणं.

केसांची समस्या दूर करण्यासाठी लोक अनेकप्रकारचे तेल आणि औषधांची मदत घेतात. पण एवढे उपचार करूनही केसांचं गळणं काही थांबत नाही. या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का की, स्वयंपाक घरातील आलं तुमची मदत करू शकते. आल्याचा एक घरगुती उपाय तुमच्या केसांनमध्ये तेज आणू शकतं.

एका ताज्या आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फोरस आणि अनेक विटामिन असतात. याच्यामुळे केसांना पोषण तर मिळतच शिवाय ते मजबूतही होतात. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे केस कसे वाचवू शकता ते सांगणार आहोत. आल्यात अँटी- ऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतं. यामुळे याचे नैसर्गिक गुण केस गळणं थांबवतात.

टक्कल होण्यापासून वाचण्यासाठी आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावा. असं केल्याने केसातील डँड्रफची समस्या दूर होईल आणि केस गळणं थांबेल. केसांना आलं लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, याच्या रसात अॅसिडचे तत्त्व असतात. त्यामुळए हा रस केसांना लावल्याने केसांत खाज सुटल्यासारखे होईल. यापासून वाचण्यासाठी जेव्हाही तुम्ही आल्याचा रस लावाल त्यानंतर केसांना सवच्छ धुवायला विसरू नका.

केस धुण्यासाठी बेबी शॅम्पूचा वापर करा. यात केमिकलची मात्रा फार कमी असते यामुळे केसांचं नुकसान होत नाही. आठवड्यातून 2 वेळा आल्याचा रस केसांना लावणं गरजेचं आहे. याशिवाय जेवणातही तुम्ही आल्याचा समावेश करू शकता.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Coconut Day- नारळाचं पाणी पिण्याचे 5 फायदे, गंभीर रोगांवर आहे रामबाण उपाय

भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...