मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एकटेपणा जाणवतोय? ही डिप्रेशनची सुरुवात तर नाही ना? या टिप्सच्या मदतीने करा एकटेपणावर मात

एकटेपणा जाणवतोय? ही डिप्रेशनची सुरुवात तर नाही ना? या टिप्सच्या मदतीने करा एकटेपणावर मात

अनेक प्रसंग असे असतात जेव्हा त्यांना आपले महत्त्व आणि अस्तित्व गमावत असल्याचे जाणवते आणि त्यामुळे एकटेपणा जाणवू लागतो. याबाबत सतत विचार केल्याने स्वभाव शांत होत जातो आणि एक वेळ अशी येते की कोणाचाही सहवास आवडत नाही.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 15 जुलै : सर्व सुख सुविधा असतानाही कधी कधी आपल्या एकटेपणा जाणवतो. अशा स्थितीत गर्दीत किंवा घरात असतानाही आपण लोकांसोबत नसतो आणि हीच स्थिती कायम राहिली तर हळूहळू जगापासून वेगळे आणि एकटे होत जातो. अनेक महिला या समस्येतून जात असल्याचे दिसते. नोकरदार असो किंवा गृहिनी महिलांचा दिनक्रम व्यस्त असतो. परंतु अनेक प्रसंग असे असतात जेव्हा त्यांना आपले महत्त्व आणि अस्तित्व गमावत असल्याचे जाणवते आणि त्यामुळे एकटेपणा जाणवू लागतो. याबाबत सतत विचार केल्याने स्वभाव शांत होत जातो आणि एक वेळ अशी येते की कोणाचाही सहवास आवडत नाही. मनातील एकटेपणा दूर करण्यासाठी कोणताही मार्ग दिसत नाही. परंतु ही परिस्थिती वेळीच हाताळली नाही तर डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. तुम्हालाही अशी समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला एकटेपणावर मात करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहोत.

या टिप्स फॉलो करून दूर करा एकटेपणा

1) तुम्हाला तुमचे दुःख एकटेपणा आणि कंटाळा दूर करायचा असेल तर पेन आणि पेपर घ्या आणि तुम्ही एकट्याने करू शकणार्‍या कामांची यादी तयार करा. या यादीत नृत्यापासून पेंटिंग, स्वयंपाक, पोहणे, व्यायाम अशा तुमच्या आवडत्या कामांचा समावेश करा.

Children Anxiety : तुमच्या मुलांच्या मनात वाढत्या स्पर्धेची भीती तर नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

2) तणाव आणि एकटेपणा दूर करण्यासाठी समाजात मिसळण्याचा प्रयत्न करा आणि लोकांशी बोला. यात तुमच्या तुमच्या मित्र, शेजारी, सोसायटीतील लोक, ऑफिसमधील लोक आणि घरातील सदस्यांचा समावेस असू शकतो. लोकांशी बोलल्यामुळे तुम्ही तुमचा तणाव आणि एकटेपणा विसरू शकता.

3) स्वत:ला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी घराबाहेर पडा आणि उद्याने, हॉटेल आणि पर्यटन स्थळांना भेट देऊन थोडा वेळ घालवा. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या घडामोडी तुमच्या लक्षात येतात आणि या गोष्टी बघून तुम्ही तुमचा एकटेपणा विसरता.

4) कुणाचीही मदत घेण्यासाठी अजिबात संकोच करू नका. तुमची समस्या अधिकच बिकट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल ती लपवण्याऐवची शेअर करा. यामुळे तुमची समस्या बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. तुम्ही मदतीसाठी विचाराल तेव्हा तुम्हाच्या मदतीसाठी अनेकजण पुढाकार घेऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला एकटेपणा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते.

Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत

5) तुमची समस्या खूपच बिकट बनली असेल तर संबंधीत तज्ञाकडून उपचार घेण्यास संकोच करू नका. अशा परिस्थितीत यावरील उपचार अनावश्यक असे असे समजू नका. तुम्ही समस्येनुसार तज्ञांना भेटलात आणि त्यांचाा सल्ला घेतला तर काही दिवसात तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Woman