जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Children Anxiety : तुमच्या मुलांच्या मनात वाढत्या स्पर्धेची भीती तर नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

Children Anxiety : तुमच्या मुलांच्या मनात वाढत्या स्पर्धेची भीती तर नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

Children Anxiety : तुमच्या मुलांच्या मनात वाढत्या स्पर्धेची भीती तर नाही ना? अशी दूर करा मुलांची एन्झायटी

पालक इतर मुलांशी आपल्या मुलाची खूप तुलना करतात आणि त्यांच्याकडून इतरांपेक्षा चांगले वागण्याची अपेक्षा करतात. अशा स्पर्धात्मक वागणूक मुलांच्या मनावर दबाव आणू शकते आणि त्यामुळे मुलामध्ये एंझायटीसारखी (Anxiety Among Children) समस्या निर्माण होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : लहानपणी मुलांना एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा एखाद्या मानसिक समस्येचा सामना करावा लागत असेल तर त्याचा प्रभाव बराच काळ कायम राहतो. त्यामुळे बालपणातील अशा प्रत्येक मानसिक विकारांपासून आपल्या मुलाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचे बालपण आणि भावी आयुष्य चांगले राहील. पालक इतर मुलांशी आपल्या मुलाची खूप तुलना करतात आणि त्यांच्याकडून इतरांपेक्षा चांगले वागण्याची अपेक्षा करतात. अशा स्पर्धात्मक वागणूक मुलांच्या मनावर दबाव आणू शकते आणि त्यामुळे मुलामध्ये एंझायटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते. एखाद्या मुलाला एंझायटीची समस्या असेल तर त्याच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी सतत भिती असते. तुमच्या मुलांनाही अशा एंझायचीचा सामना करावा लागत असेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही त्यांची समस्या कमी करू शकता. अशी दूर करा मुलाच्या मनातील एंझायटी एनपीआर डॉट ओराजीनुसार मुलाच्या एंझायटीचे कारण शोधणे आवश्यक असते. भविष्यातील आव्हानांमुळे अनेक वेळा ते चिंतेत राहतात आणि त्यामुळे या प्रकरणात त्यांना तुम्ही साथ द्यायला हवी. मुलामध्ये एंझायटीची लघणे पहा. तशी लक्षणे दिसल्यास वेळीच त्यांची मदत करा. Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत मुलांना मानसिक आधार द्या आणि गरज पडल्यास थेरपिस्टकडे घेऊन जा. मुलाला पूर्णपणे मनमोकळे बोलण्यासाठी त्याच्या मनात स्थान निर्माण करा, जेणेकरून तो किंवा ती त्याच्या सर्व समस्या तुमच्यासोबत शेअर करू शकेल. Kidney Stone Stomach Pain : आता त्रास सहन करू नका; ‘हे’ आहेत किडनी स्टोनमुळे होणाऱ्या पोटदुखीवर उपाय अशी द्या मुलांची साथ मुलांची भीती ऐकून हसू नका, तर त्याच्या भावना समजून घ्या. त्यांना सुरक्षित वाटेल अशा पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या भावना समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करा. मुलाला लढण्यास आणि त्याच्या भीतीवर मात करण्यास मदत करा. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा जेणेकरून ते स्वतःवर कधीही शंका घेणार नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात