मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एका फ्लॅटच्या किंमतीला विकलं जातंय अख्खं गाव; नागरिक घर सोडून पसार, काय आहे याचं रहस्य?

एका फ्लॅटच्या किंमतीला विकलं जातंय अख्खं गाव; नागरिक घर सोडून पसार, काय आहे याचं रहस्य?

या गावाचा सतराव्या शतकाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

या गावाचा सतराव्या शतकाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

या गावाचा सतराव्या शतकाशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

  आजही जगात अशा काही गोष्टी घडत असतात ज्याचा उलगडा विज्ञानालाही करता आलेला नाही. जगात अशी अनेक गुढरम्य ठिकाणं आहेत ज्याचं रहस्य आजही अनाकलनीय आहे. भूतपिशाच्च हीदेखील अशीच एक गोष्ट आहे. अनेकदा आपण ऐकतो, वाचतो की एखादी वास्तू बाधित आहे. म्हणजेच त्या वास्तूमध्ये भूतांचं वास्तव्य आहे असं मानलं जातं. पण ऐकून आश्चर्य वाटेल स्कॉटलंड (Scotland) या युरोपातील एका नितांत सुंदर देशात एक संपूर्ण गाव भूतबाधा असल्यानं विकायला काढण्यात आलं असून अक्षरशः कवडीमोलानं हे सुंदर गाव विकलं जात आहे. आपल्या भारतात नोएडामध्ये (Noida) एका फ्लॅटची जी किंमत असेल त्या किमतीत हे अख्खं गाव विकत घेता येणार आहे. झी न्यूज डॉट इंडिया डॉट कॉमनं हे वृत्त दिलं आहे.

  या गावाचं नाव आहे लोच ताई (Loch Tay). ओल्ड व्हिलेज ऑफ लॉर्स पर्थशायरमध्ये (Old Village of Lawers Perth shire)एका नदीच्या काठावर वसलेलं हे शेकडो वर्ष जुनं गाव अतिशय निसर्गसंपन्न आहे. 3.31 एकर परिसरात हे गाव वसलं असून इथं गर्द घनदाट जंगल आहे. लाकडी घरं आहेत. सतराव्या शतकातील प्राचीन भव्य वास्तूचे अवशेष इथं आहेत. स्कॉटलंडमधील एक रमणीय ठिकाण असलेल्या या भागात लोक निसर्गाचा आनंद लुटायला येत असत; पण या गावात भूतांचा वावर असल्याच्या बातम्यांनी हे गाव ओसाड पडलं. 1841 मध्ये या गावात फक्त 17 लोक राहत होते. हळूहळू ही संख्याही कमी झाली आणि 1926 च्या सुमारास हे संपूर्ण गाव निर्मनुष्य झालं.

  हे ही वाचा-हात आहे की हातोडा! फक्त कोपराने एका मिनिटात धडाधड फोडले 279 अक्रोड; पाहा VIDEO

  सतराव्या शतकात या गावाची मालकी असलेल्या लेडी ऑफ लॉर्सचा (Lady of Lawers) आत्मा आजही या गावात भटकतो असं म्हटलं जातं. तिच्या घराचे अवशेष आजही या गावात आहेत. त्या काळात तिनं वर्तवलेली भविष्यवाणी सत्य ठरली आहे. जहाजं, रेल्वे धुरावर चालतील अशी भविष्यावाणी केली होती. ती खरी झाली आहे. तिचा आत्मा आजही या गावात वावरत असल्याचा अनुभव इथं राहणाऱ्या लोकांना आला असून, इथं फिरायला येणाऱ्या लोकांनाही अशा शक्तींचा अनुभव आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता हे गाव ओसाड पडलं आहे.

  खरचं इथं भूतपिशाच्चाचा वावर आहे की या अफवा आहेत याची शहानिशा झालेली नाही. मात्र भूतांच्या भीतीनं निर्मानुष्य झालेलं हे गाव आता विकायला काढण्यात आलं आहे. या आधी 2016 मध्ये फक्त एक कोटी रुपयात ते विकण्यात आलं होतं. पण भूतांच्या भीतीनं इथं राहण्यास कोणी तयार नसल्यानं हे सुंदर गाव पुन्हा लोकांच्या चाहुलीनं बहरलं नाहीच. त्यामुळं ते खरेदी करणाऱ्या मालकानं 1 लाख 25 हजार युरो म्हणजे 1 कोटी 29 लाख रुपये इतक्या किमतीत ते विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे गाव खरेदी करणाऱ्या व्यक्तीला इथं खासगी बीच, नदीत मासेमारी करण्याची विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. तेव्हा भूतांचा सामना करण्याची तयारी असेल तर एका फ्लॅटच्या किमतीपेक्षाही कमी किंमतीत स्कॉटलंडसारख्या सुंदर देशातील एका रमणीय गावाची मालकी मिळू शकते.

  First published:

  Tags: Village