मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शेतकऱ्याची Lockdown मधल्या कमाईची नवी शक्कल; बोकडांबरोबर zoom call

शेतकऱ्याची Lockdown मधल्या कमाईची नवी शक्कल; बोकडांबरोबर zoom call

Goat

Goat

हे सर्व हास्यास्पद आहे. पण खरं आहे. इंग्लंंडमधल्या शेतकरी महिलेने zoom call वर बोकड भाड्याने देऊन चक्क 50 हजार पौंड म्हणजे जवळपास 50 लाख रुपयांची कमाई केली आहे.

लंडन, 4 फेब्रुवारी : कोरोना महासाथीमुळे (Corona Pandemic) अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (LockDown) जारी करण्यात आला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या दैनंदिन भेटीगाठींवर मर्यादा आल्या. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन मिटींग्ज (Online Meetings) आयोजित केल्या जाऊ लागल्या. यामुळे कामाच्या निमित्ताने किंवा नातेवाईक, मित्रांशी दैनंदिन संवाद साधणं कोरोना काळातही सोपं जाऊ लागलं. आता अनेक देशात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथीलता आणली गेली असली तरी ऑनलाईन संवाद कुठेही कमी न होता तो वाढतच आहे.

यात गेल्या काही महिन्यांपासून झूम (Zoom) हा शब्द अगदी प्रत्येकासाठी परवलीचा बनला आहे. त्यातही जे Work from home करत आहेत त्यांच्यासाठी Zoom app अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. दैनंदिन मिटिंग्ज, मित्र, सहकारी, नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी झूम उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर या अॅपचा अन्य कारणांसाठीही उपयोग केला जात आहे. हे अॅप वापरणाऱ्यांपैकी इंग्लडमधील लॅंकेशायरमधील रोसेनडेल गावातल्या शेतकरी महिलेने एक भन्नाट कल्पना लढवली. डॉट मॅककार्थी (Dot Mccarthi) नावाच्या  या शेतकरी महिलेनं झूमचा वापर करत उत्पन्नाचा एक नवा मार्ग शोधला आहे.

हे देखील वाचा -  नणंद भावजय अचानक आले आमने-सामने, रस्त्यावरच सुरू झाली मारामारी, LIVE VIDEO

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, मॅककार्थी हिने बोकडांशी संबंधित ऑनलाईन व्हिडीओ कॉल सेवा (Online Video Call Service) झूमच्या माध्यमातून सुरु केली आहे. सध्या या मनोरंजक सेवेची सर्वत्र चर्चा होत आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, मॅककार्थी हिने सुरु केलेली ही सेवा प्रथम सर्वांना विनोद वाटत होता. परंतु, आता ती लोकांच्या पसंतीस उतरत आहे. लॉकडाऊनच्या काळात झूम कॉलच्या मदतीने बोकड भाडेतत्वावर देत सुमारे 50 हजार पाउंड्सची कमाई केल्याचे मॅककार्थी हिने सांगितले. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ऑस्ट्रेलिया, रशिया, चीन आणि अमेरिकेसह जगभरातील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याने तिचे बोकड आता जागतिक पातळीवर पोहोचले आहेत. तसेच तिने स्वतःची वेबसाईट (Website) सुरु केली असून त्या माध्यमातून देखील लोकांना बोकड भाडेतत्वावर (Hiring) घेता येऊ शकतात. त्याचप्रमाणे केवळ एका कॉलवर व्हर्च्युअल फार्म टूर बुक करण्याची किंवा खाण्याकरिता एखादं बोकड खरेदी करण्याची सेवा देखील तिने सुरू केली आहे.

"मी दिवसभर फोन कॉलवर असते आणि लोक उत्सुकतेने जोडलेली असतात. कारण या बिझनेस मिटींगला त्यांच्याबरोबर फक्त बोकड उपस्थित असतं आणि याबद्दल त्याची बाॅस अनभिज्ञ असते." मॅककार्थी गार्डियनशी बोलताना सांगते, की "हे सर्व हास्यास्पद आहे. पण खरं आहे. या क्षणी लोकांना काही वेगळंच हवं असतं, असं काही जे त्यांना वर्तमानाचा विसर पाडेल आणि अन्य सर्व गोष्टी ते विसरून नव्या रुटीनला सामोरे जातील."

First published:

Tags: Corona, Farmer, Lockdown, Video call