Home /News /lifestyle /

Bathroom Pic: या महिलेनं फेसबुकवर का पोस्ट केला असा टॉयलेटमधला फोटो?

Bathroom Pic: या महिलेनं फेसबुकवर का पोस्ट केला असा टॉयलेटमधला फोटो?

गीता यथार्थ भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असून त्या एकल पालक (single parent) आहेत.

  मुंबई, 3 मार्च : टॉयलेटचा  दरवाजा अर्धा उघडा ठेवत कमोडवर बसलेला हा फोटो या महिलेने का शेअर (Facebook post of bathroom pic) केला असावा असं वाटतं? या फोटोने सोशल मीडियावर एका वेगळ्याच विषयावर तोंड फोडलं आहे आणि मतमतांतरं व्यक्त होत आहेत. भारतीय संस्कृतीत एखाद्या महिलेचं आई हे रूप प्राचीन काळापासून गौरवलं जातं. महिलेच्या आयुष्यात चांगली आई होण्याचा टप्पा म्हणजे अंतिम ध्येय, ते सर्वात महत्त्वाचं... इतकंच काय तर आई बनल्याशिवाय तिच्या अस्तित्वालाच पूर्णत्व येत नाही अशीही सामाजिक धारणा आहे. या गौरवीकरणामुळं महिला आई होताना किंवा आई झाल्यावरही मातृत्व आणि पालकत्वाच्या जबाबदारीला निभावताना होणारे त्रास क्वचितच बोलून दाखवतात. हे त्रास अतिशय लहान-सहान किंवा खूप गंभीरही असू शकतात. फेसबुकवर याबाबत गीता यथार्थ या लेखिकेचा एक फोटो आणि लहानशी पोस्ट व्हायरल झाली आहे. (Facebook photo by Geeta Yatharth) गीता यथार्थ भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असून त्या एकल पालक (single parent) आहेत. गीता यांनी आपला दरवाजा अर्धा उघडा ठेवत कमोडवर बसलेला फोटो शेअर केला आहे. सोबतच त्या लिहितात, 'मी टॉयलेटचं दार सर्वात शेवटी कधी बंद केलं होता, मला आठवत नाही. आता तर परिस्थिती अशी आहे, की ऑफिसमध्येही टॉयलेटचं दार बंद करणं लक्षात राहत नाही अनेकदा. आणि आता मुलाला फोटो काढणंही जमायला लागलं आहे.' या पोस्टला त्यांनी लाईफ ऑफ अ सिंगल मदर असं संबोधलं आहे. पुढं त्यांनी लिहिलं आहे, 'मदरहूड अर्थात आईपण निभावणं हा सोपा जॉब नाही. तो स्वर्गीयही नाही. त्याचं उदात्तीकरण थांबवा.' (Geeta Yatharth toilet post) गीता यांची पोस्ट कमी काळातच लक्षवेधी ठरली. बहुतांश लोकांनी त्यांचे हे मुद्दे मांडल्याबद्दल अभिनंदन केलं. मात्र काही मोजक्या लोकांनी त्यांना अतिशय असभ्य भाषेत ट्रोल केलं आहे. काहींनी त्यांची खिल्ली उडवत त्यांना सेन्सेशनल, उथळ ठरवलं आहे. याबाबत अजून एक पोस्ट लिहून त्यांनी यामागची सविस्तर भूमिका आपल्या वॉलवर मांडली आहे. (Geeta Yatharth single parent post)
  वॉशरूम का लास्ट टाइम गेट कब क्लोज किया था, याद नहीं. अब तो हालात ये है कि ऑफिस में भी, टॉयलेट का दरवाजा बंद करना याद... Posted by Geeta Yatharth on Tuesday, March 2, 2021
  हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज असं विचारणाऱ्यांना त्या या स्वतंत्र पोस्टमध्ये उत्तर देतात, की पुरुष मूल तेव्हाच सांभाळतो जेव्हा स्त्री काही काळासाठी ते त्याच्याकडे सोपवते. महिलेसारखी त्याच्यावर ही जबाबदारी सर्वकाळ लादलेली नसते. आपण अजूनही मदरहूड हा शब्द पॅरेण्टहूड या शब्दानं रिप्लेस करू शकलेलो नाही. याबाबत कुणी बोलायला गेलं की आईपण महान असल्याचं सांगत तिला शांत बसवलं जातं. मार्ग कधीच काढले जात नाहीत. समानता आणण्याची गोष्ट केली जात नाही. याबाबत बोलण्यासाठी या फोटोला निमित्त म्हणून पाहणं अपेक्षित आहे.' (Geeta Yatharth bathroompic fb post) हेही वाचा आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न सोबतच आजवर देश-विदेशातील महिलांनी अशाचप्रकारचे फोटो टाकत आपलं म्हणणं मांडलेलं असल्याचंही एका स्वतंत्र पोस्टमध्ये फोटोंसह सांगितलं आहे. baathroompic हा हॅशटॅग गीता यांनी यासाठी वापरला आहे. हेही वाचा बिपाशा बसू नवऱ्याला म्हणाली 'बर्निंग मंकी'! नेमकं काय घडलं? पाहा VIDEO गीता यांची फेसबुक वॉल पाहिल्यावर समाजमाध्यमांवर त्या कायमच सक्रिय असल्याचं दिसतं. केवळ समाजमाध्यमांवरच नाही तर हिंदी इंग्रजी माध्यमांमधील महत्त्वाच्या वृत्तपत्र आणि मासिकांमधून त्यांनी दीर्घकाळ जेंडर, समाज आणि संस्कृतीविषयक मुद्द्यांवर लिखाण केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Facebook, Viral photo

  पुढील बातम्या