मालदीव, 2 मार्च : बॉलिवूडची बिनधास्त गर्ल म्हणून अभिनेत्री बिपाशा बसूला (Bipasha Basu) ओळखलं जातं. बिपाशा नेहमीच आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना वेड लावते. बिपाशा सध्या आपला पती करण सिंग ग्रोवरसोबत (Karan Singh Grover) मालदीवमध्ये (Maldives) सुट्टीचा भरपूर आनंद लुटत आहे. आणि मालदीवमधील आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत आहे. त्यामध्ये करण आणि बिपाशा मालदीवमध्ये मौजमज्जा करताना दिसत आहेत. चाहतेही या फोटोंना मोठ्या प्रमाणावर पसंद करत आहेत.
नुकताच बिपाशा बसूने पती करणसिंग ग्रोवरचा एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये करण समुद्रामध्ये बसलेला दिसून येत आहे. आजूबाजूला निळाशार समुद्र दिसत आहे. आणि उन्हाचा तडाखासुद्धा जोरदार असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करण उन्हाची जोरदार झळ लागत असल्याचं दाखवत आहे. आपल्या हातावर जणू आग ठेवल्यासारखी क्रिया करून तो एक मजेशीर प्रसंग निर्माण करत आहे. बिपाशा या सगळ्या प्रसंगच खूप आनंद लुटत आहे. बिपाशा स्वतः हा व्हिडीओ शूट करत आहे. आणि शूट करताना ती हस्त असल्याचा आवाज देखील येत आहे. त्याचबरोबर ती करणला 'बर्निंग मंकी' असं म्हणत आहे. कारण या व्हिडीओमध्ये करणची त्वचा खूपच रापलेली दिसत आहे. अशाप्रकारे हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram