मुंबई, 16 मे : निरोगी जीवनशैलीचा आनंद घेण्यासाठी आरोग्यासोबतच शरीराच्या काही भागांची जाणीवपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या आणि नाजूक भागांमध्ये डोळ्यांचाही समावेश होतो. अनेक वेळा विशेष काळजी घेऊनही डोळ्यात जळजळ, पापण्यांना खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, अॅलर्जीमुळे पापण्यांना सूज आणि खाज सुटणे, डोळ्यांवर लालसरपणा, जळजळ, गुठळ्या जाणवतात. वैद्यकीय भाषेत पापण्यांना खाज येण्याच्या समस्येला अॅलर्जीक कंजक्टिव्हिटीज म्हणतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासोबतच पापण्यांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. डोळे आणि पापण्यांची कशी काळजी घ्यावी या संबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
डोळा किंवा पापण्यांना होणाऱ्या त्रासाची लक्षणे -
पापण्यांमध्ये वारंवार खाज येणे हे डोळ्याभोवती समस्या असल्याचे लक्षण आहे. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता असते. पापण्यांवर खाज सुटल्याने डोळ्यात जळजळ, डोळे पाणावणं, डोळे लाल होणे, शिंका येणे आणि डोळ्याभोवती किंवा संपूर्ण चेहऱ्यावर सूज येते. समस्या गंभीर बनल्यास कधीकधी नीट दिसतही नाही.
पापण्यांना खाज येणे –
पापण्या खाजण्याची अनेक कारणे असू शकतात. व्हायरल इन्फेक्शन्स जसे की सामान्य सर्दी, डोळे आणि पापण्यांच्या पृष्ठभागावर सूज येणे, खूप ताप येणे, मेकअप करताना वापरल्या जाणार्या सौंदर्य उत्पादनांच्या साईड इफेक्टशिवाय अनेक कारणे आहेत. कोणाला पापण्यांना खाज सुटण्याचा त्रास होत असेल तर हेल्थलाइनमध्ये दिलेल्या घरगुती टिप्स फॉलो करा, जेणेकरून ही समस्या कमी होऊ शकेल.
कोल्ड कॉम्प्रेसर -
पापण्यांची खाज कमी करण्यासाठी तुम्ही कोल्ड कॉम्प्रेस वापरू शकता. या अंतर्गत डोळ्यांवर बर्फ लावून काही वेळाने डोळे थंड पाण्याने धुऊन पापण्यांच्या खाज सुटण्यापासून आराम मिळतो. हवे असल्यास थंड पाण्यात मऊ कापड भिजवून काही वेळ डोळ्यांवर ठेवा. पापण्या खाजत असतील तर डोळे वारंवार चोळू नका.
एरंडेल तेल -
एरंडेल तेल असलेले आय ड्रॉप्स पापण्यांच्या खाज कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. अशा आय ड्रॉप्सचा फक्त एकच थेंब डोळ्यांमध्ये टाकावा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास आराम मिळेल.
हे वाचा - जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या
कोरफड जेल -
कोरफडीमध्ये दाहक विरोधी दाहक गुणधर्म आहेत. जळजळ, खाज सुटणे यावर नैसर्गिक उपाय आहे. पापण्यांवर कोरफड जेल वापरण्यासाठी 1 चमचा कोरफड जेल घ्या आणि तो 2 चमचे पाण्यात चांगले मिसळा. त्यात कापूस बुडवून डोळे बंद करा आणि कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
हे वाचा - लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत
पापण्यांना खाज येण्याकडे दुर्लक्ष करू नका –
अनेक लोक पापण्यांना खाज येणे, ही एक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. असा निष्काळजीपणाही गंभीर समस्येचे कारण बनू शकतो. अनेक वेळा पापण्यांना खाज सुटल्याने डोळ्यांना गंभीर संसर्ग होऊन दृष्टी नष्ट होण्याचा धोका वाढू लागतो. त्यामुळे 24 तासांत आराम न मिळाल्यास डॉक्टरांना भेटा आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eyes damage, Health, Health Tips