Home /News /lifestyle /

Red Watermelon: लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना या गोष्टी पाहायच्या असतात

Red Watermelon: लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना या गोष्टी पाहायच्या असतात

कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मजा येते. मात्र, बाजारातून आणलेले कलिंगड कापेपर्यंत आपल्याला खात्री नसते की ते लाल-गोड असेल की नाही. यासाठी खरेदी करताना कोणत्या टिप्स ध्यानात ठेवायच्या याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 13 मे : उन्हाळी हंगाम सुरू असल्याने प्रत्येक घरात कलिंगड भरपूर खाल्ली जातात. कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते. हे फळ खाल्ल्याने शरीर आतून थंड राहते आणि अनेक प्रकारे आरोग्यालाही फायदा होतो. हे फळ चवीला गोड असते. काही लोकांना कलिंगड काळे मीठ किंवा हलकी साखर घालून खायला आवडते. टरबूजमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे शरीराला उन्हाळ्यातील अनेक आजारांपासून (Summer Season Fruits) वाचवतात. मात्र, कलिंगड लाल आणि गोड असेल तरच खायला मजा येते. मात्र, बाजारातून आणलेले कलिंगड कापेपर्यंत आपल्याला खात्री नसते की ते लाल-गोड असेल की नाही. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, लाल कलिंगड शोधून घेण्यासाठी काही टिप्स वापराव्या लागतात, त्याविषयी जाणून घेऊया. गोड आणि लाल टरबूज कसे ओळखावे? हलकसं पिवळं झालेलं असतं - बरेच लोक हिरवे कलिंगड विकत घेतात, तसं न करता जे कलिंगड हलकसं पिवळ्या रंगाचे झालेले असते, ते खरेदी करा. गोड आणि आतून लाल निघेल. टरबूजच्या तळाशी जितके अधिक पिवळे डाग असतील तितके टरबूज गोड असेल. हलके वाजवून पाहा - कलिंगड विकत घेताना एका हातात उचलून दुसऱ्या हाताने वाजवून पाहा. टरबूज गोड असेल तर ढक-ढक आवाज येईल, पण गोड नसेल तर आवाज येणार नाही. फुटलेलं, कट झालेलं घेऊ नका - टरबूज खरेदी करताना, कोठूनही छिद्र नाही किंवा ते कापलेलं किंवा फुटलेलं नाही याची खात्री करा. आजकाल, टरबूज लवकर वाढण्यासाठी त्याला हार्मोनल इंजेक्शन देतात ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते. हे वाचा - चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व वजन बघा - कलिंगड जास्त जड आणि भरलेले वाटत असेल तर त्याची चव चांगली निघणार नाही. हातात घेतल्यानंतर आकाराने मोठं असलं तरी त्याप्रमाणात वजनानं हलकं वाटत असेल तर ते चवीला चांगलं असतं. हेे वाचा - 16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, या 5 राशीच्या लोकांनी आतापासूनच राहा सावध आकार पाहून घ्या - अंडाकृती आकाराचे कलिंगड/ टरबूज बहुतेकदा गोडच असतात, असं दिसून आलं आहे. त्यामुळे वाकड्या-तिकड्या आकाराचे किंवा गोल कलिंगड घेण्यापेक्षा फक्त अंड्याच्या आकाराचेच कलिंगड कधीही खरेदी करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Summer, Summer season

    पुढील बातम्या