पावसाळा आला म्हणजे व्हायरल फिव्हरची सुरुवात होते. वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला सारखे काही त्रास व्हायला लागतात. त्यामुळे या काळात आपली इम्युनिटी चांगली ठेवणं आवश्यक आहे. तज्ञांच्यामते इम्युनिटी वाढवण्यासाठी काही पदार्थ फायदेशीर असतात.
कोरोना काळामध्ये लोकांना गुळवेल या वनस्पतीची माहिती झालेली आहे. गुळवेल अॅन्टीऑक्सिडंट्स पॉवरहाउस मानलं जातं. यामध्ये अनेक प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता असते. गुळवेल डायबेटिस, संधिवात, बद्धकोष्टता, एन्झायटी,दमा यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे.
व्हिट ग्रासमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. व्हिट ग्रास घरच्याघरीही बनवता येतं. यामुळे पचन सुधारतं, रेड ब्लड सेल्स वाढतात. याशिवाय पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाईट प्रोडक्शन देखील वाढतं. हे सगळे घटक आपल्या बॉडी फंक्शनिंगसाठी फायदेशीर असतात.
सगळ्यांच्या घरी तुळस लावलेली असते. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. तुळशीची पानं खाल्ल्यामुळे डायबेटीज, कॅन्सर, रेस्पिरेटरी डिसॉर्डर, क्रॉनिक फिव्हर यामध्ये फायदा होतो.
अंजीर चवीला उत्तम असतं. याशिवाय यामध्ये न्यूट्रिशनचं प्रमाण खूप जास्त असतं. ब्लडप्रेशर, कॅन्सर, डायबेटिज आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये अंजीर खाण्याने फायदा होतो. याशिवाय वजन कमी करण्यासाठी अंजीर खाऊ शकता.
कोरफडमध्ये चमत्कारिक फायदे असतात. यामध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहेत. कोरफड त्वचेचे आजार, डायजेशन आणि डिटॉक्सीफिकेशनमध्ये फायदेशीर आहे यामध्ये नॅशनल अॅन्टीबायोटिक्स अॅन्टीबॅक्टरियल घटक असतात त्यामुळे वायरल इन्फेक्शनमध्ये फायदा होतो.
किशमिश गोड पदार्थांमध्ये, मिठाईमध्ये किंवा घरी बनवलेल्या खीर किंवा शिऱ्यामध्ये वापरतो. किसमिसमध्ये देखील गुणकारी घटक आहेत. व्हिटॅमिन, इलेक्ट्रोलाईट आणि मिनरल्स असणारं किशमिश इम्युन सिस्टिम चांगलं ठेवतं.
कॅन्सर, ब्लडप्रेशर यासारख्या आजारातदेखील किशमिश खाण्याने फायदा होतो. दररोज किशमिश खाल्ल्यास व्हायरल इन्फेक्शन पासून बच्चा होतो, इम्युनिटी वाढते.
पपईच्या पानांची चव कडू असते मात्र, याचे फायदे भरपूर आहेत, डेंग्यू सारख्या तापामध्ये पपईच्या पानांचा रस फायदेशीर असतो. यामुळे प्लेटलेट काउंट वाढतात. डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया सारख्या तापामध्ये हा रस प्यायला हवा. पपईच्या पानाचामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन देखील असतात. त्यामुळे आजारपण दूर राहतं.