मुंबई, 11 डिसेंबर : हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये स्पर्धा आहे. नोकरीमध्ये स्पर्धा, मुलांना अभ्यासात स्पर्धा सर्व ठिकाणी माणसाला स्वतःला सिद्ध करावं लागत. अशावेळी माणसाचा मेंदू मजबूत आणि तल्लख असणं अवश्य असतं. म्हणूच मेंदूच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी लोक भरपूर बदाम खातात. पण तुम्हाला माहितीये केवळ बदामच तर अंडीदेखील तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. पाहुयात कसे.. अंड्यांमध्ये अमिनो अॅसिड, लोह, जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅरोटीनॉइड्स त्याचप्रमाणे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असे रोगाशी लढणारे पोषक घटक असतात. E Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, रोज एक अंडे खाल्ल्याने शरीराला 75-76 कॅलरीज, 7-8 ग्रॅम प्रोटीन, 5 ग्रॅम फॅट, 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व मिळू शकतात.
Weight Loos Tips : वजन कमी करायचंय? मग रात्रीच्या आहारात सामील करा हे पदार्थकाय सांगतो अभ्यास 18 ते 75 वर्षे वयोगटातील 79 सहभागींचा समावेश असलेल्या न्युट्रिशनल न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, अंड्यांमुळे संज्ञानात्मक कार्यामध्ये सुधारणा होते. प्रमुख संशोधक किरण कॅम्पबेल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर इट दिस, नॉट दॅटमध्ये नमूद केलेल्या अभ्यासाच्या तपशिलानुसार, अंडी आणि अंड्यातील प्रथिने हायड्रोलायसेटचे रासायनिक बनलेले फायदे, अंड्यातील प्रोटीन तुटल्यामुळे होऊ शकतात.
त्याचप्रमाणे अभ्यास NWT-03 hydrolysate कंपाऊंडवर दर्शवितो, ज्यामध्ये मेंदूच्या इतर कार्यांमध्ये संज्ञानात्मक कार्य वाढवण्याची आणि आत्म-नियमन, सर्जनशीलता, लक्ष कालावधी, तर्कशक्ती, कार्य स्मृती, प्रतिबंधात्मक नियंत्रण आणि मानसिक लवचिकता सुधारण्याची क्षमता आहे. मात्र याबद्दल अजून संशोधनांची आवश्यकता आहे. या पदार्थांमुळे उडते झोप आणि पडतात वाईट स्वप्न; रात्रीच्यावेळी चुकूनही खाऊ नका अभ्यासानुसार, अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये कोलीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे फायटोन्यूट्रिएंट्स असतात. हे पोषक घटक अनेक अभ्यासांनुसार सुधारित संज्ञानात्मक कार्याशी देखील संबंधित असू शकतात. कॅम्पबेल यांनी सांगितले की, तरीही एखाद्याने अंड्यांचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. कारण अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये आहारातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते आणि ते जास्त प्रमाणात आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.