जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग रात्रीच्या आहारात सामील करा हे पदार्थ

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग रात्रीच्या आहारात सामील करा हे पदार्थ

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग रात्रीच्या आहारात सामील करा हे पदार्थ

आजकल अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. परंतु आता चिंता सोडून कामाला लागा आणि रात्रीच्या आहारात येथे दिलेल्या पदार्थांचा समावेश करा.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर : आजकाल अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक जण व्यायाम आणि धावण्याचे पर्याय निवडता. याशिवाय काही जण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी डायटिंग सुरू करतात. आहारात केवळ योग्य पदार्थांचा समावेश करणेच नाही, तर वजन कमी करण्यासाठी योग्य वेळी योग्य आहार घेणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. वजन कमी करण्यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश केला जातो ज्याने वजन नियंत्रणात राहील. तसेच रात्री खाल्लेल्या अन्नाचा शरीरावर जास्त परिणाम होतो, त्यामुळे रात्रीचा आहार योग्य असणे अतिशय महत्त्वाचे असते. आजच्या या लेखातून आपण रात्री कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेणार आहोत.

या पदार्थांमुळे उडते झोप आणि पडतात वाईट स्वप्न; रात्रीच्यावेळी चुकूनही खाऊ नका

रात्रीच्या आहारात घ्या हे पदार्थ ओट्स : ‘हरजिंदगी’च्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी ओट्स खूप उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले फायबर, प्रोटिन्स शरीर निरोगी बनवतात आणि चरबी कमी करतात. रात्रीच्या आहारातही याचा समावेश केला जाऊ शकतो. ओट्समध्ये आढळणारे बीटा-ग्लुकन आतडे स्वच्छ करते आणि खराब कोलेस्ट्रॉल, तसेच बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.

News18लोकमत
News18लोकमत

मासे : वजन कमी करताना बहुतेक लोकांचे चरबीसोबत स्नायू देखील कमी होतात. त्यामुळे ते अशक्त होऊ लागतात. अशावेळी मासे खाल्ल्यास चरबी कमी होण्यासोबतच आणि स्नायू देखील मजबूत होतात. मास्यांमध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड हृदयासाठी चांगले असते. अंड्याचा पांढरा भाग : उकडलेल्या अंड्याच्या पांढऱ्या भागात पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी-12, बी2 असते. तुम्ही मांसाहारी असाल तर रात्रीच्या जेवणात अंड्याचा पांढरा भाग खाऊ शकता. अंड्याचा फक्त पांढरा भाग प्रोटीन युक्त असतो आणि त्यात फॅटही कमी असते. अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि डोकेदुखीची समस्या दूर करण्यास मदत होते. रताळे : रताळ्यामध्ये बटाट्यापेक्षा कमी प्रमाणात कॅलरीज असतात. यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत होते. याशिवाय रात्रीच्या जेवणात रताळे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि वाढलेले वजन हळूहळू कमी होऊ लागते. पनीर : पनीर हा प्रोटीनचा योग्य स्रोत आहे. ते खाल्ल्याने आरोग्याला फायदा होण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत होते. परंतु पनीर कच्चे खाणे जास्त फायदेशीर मानले जाते. तुम्ही रात्रीच्या वेळी ते कोशिंबिरीत घालून खाऊ शकता. यामुळे तुमचे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. सूप : वजन कमी करणाऱ्यांना अनेकदा आहारात काय घ्यावे असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत तुम्ही सूप घेऊ शकता. हिरव्या भाज्यांचे सूप हा उत्तम पर्याय आहे. सूपमध्ये कार्बोहायड्रेट, खनिजे, पोषण आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वजनही नियंत्रणात राहते. फक्त हिरव्या भाज्यांचे सूप बनवताना त्यात लोणी किंवा चीज घालू नका.

…म्हणून हिवाळ्यात दही खायचं ते मातीच्या भांड्यातीलच; फायदे वाचून थक्क व्हाल

ब्राऊन राइस : ब्राऊन राइसमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. तो खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजनही नियंत्रणात राहते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दिवसा देखील ब्राऊन राइस खाऊ शकता. यात असलेल्या पोषक घटकांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्या देखील दूर होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ब्राऊन राइस खूप फायदेशीर ठरतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात