मुंबई 10 ऑक्टोबर : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या आरोग्याकडे पाहाण्यासाठी जराही वेळ मिळत नाही. परंतू आरोग्य चांगलं नसेल, तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या आयुष्यावर होतो. ज्यामुळे माणूस आजारी पडतो, एवढंच काय तर इतर अनेक त्रास देखील उद्भवतात. बऱ्याच लोकांना अशी सवय असते की ते रात्री जेवल्यानंतर लगेच झोपायला जातात. परंतू हे लक्षात घ्या की ते आरोग्यासाठी चांगले नाही. रात्रीच्या जेवणानंतर चालणे केव्हाही आरोग्यासाठी फायदेशीर असते. जेवणानंतर 20-30 मिनिटे वेगाने चालणे किंवा जॉगिंग केल्याने पचन चांगले होते. यामुळे पोटाची चरबी कमी होते. याव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाता, तेव्हा तुम्ही घेतलेली पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने वापरली जातात. चला जाणून घेऊयात रात्री फेरफटका मारण्याचे फायदे चांगले पचन पचन ही एक मंद प्रक्रिया आहे. त्यासाठी वेळ लागतो. आपण जेवण संपवल्याबरोबर पचन सुरू होते, परंतु आपण अन्न नीट चघळत नाही किंवा जास्त पाणी पीत नाही तेव्हा पचन प्रक्रिया मंद होऊ शकते. यामुळे पचनक्रिया बिघडते, ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत अन्न खाल्ल्यानंतर चालण्याने आपली पचनक्रिया व्यवस्थित होते. हे वाचा : Side Effects of Cucumber : यावेळी चुकूनही खाऊ नका काकडी, फायद्याऐवजी होईल नुकसान चयापचय गती रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याने पचन लवकर होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची तक्रार नसते. चयापचय ही अन्नानंतर पचनाची पुढील प्रक्रिया आहे. चयापचय मध्ये, शरीर अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतरित करते. या क्रियेमध्ये एक अतिशय जटिल जैवरासायनिक प्रक्रिया समाविष्ट आहे. ज्याद्वारे आपल्या अन्नातील उष्मांक आणि ऑक्सिजन हे शरीरातील विविध जीवांना कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्जेच्या स्वरूपात सोडले जातात. जेवणानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया गतिमान होते, तसेच चयापचय क्रिया वाढते. चांगली झोप शांत झोपण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जा. कधीकधी तुम्ही तणावाने झोपता. काम किंवा वैयक्तिक जीवनातील त्रास तुम्हाला शांत झोपू देत नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारल्याने तणावाची पातळी कमी होते. रक्ताभिसरणाला चालना मिळते. रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे वाचा : चेहऱ्यावर साय/मलई लावण्याचे आहेत हे 5 फायदे, महागड्या क्रीमही पडतात मागे रक्तातील साखर कमी करणे जेवणानंतर फेरफटका मारल्याने रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. तुम्हाला मधुमेह असल्यास, जेवणानंतर 30 मिनिटे चालणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करू शकते. निरोगी जीवनशैली जगणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.