जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / चेहऱ्यावर साय/मलई लावण्याचे आहेत हे 5 फायदे, महागड्या क्रीमही पडतात मागे

चेहऱ्यावर साय/मलई लावण्याचे आहेत हे 5 फायदे, महागड्या क्रीमही पडतात मागे

चेहऱ्यावर साय/मलई लावण्याचे आहेत हे 5 फायदे, महागड्या क्रीमही पडतात मागे

Milk cream benefits- दुधाच्या साय/मलईमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ते चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मलई त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.

  • -MIN READ Lanja,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : प्रत्येकजण आपली त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करत असतो. अनेकदा महागडे स्कीन प्रॉडक्ट, सौदर्य प्रसाधनेही त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. काही घरगुती उपायांनीही चेहरा उजळ आणि चमकदार बनवता येतो. यामध्ये चेहऱ्यावर मलई किंवा साय लावण्याचा फायदा होतो. दुधाच्या साय/मलईमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, ते चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मलई त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. मलईमध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. चेहऱ्यावर साय लावून चेहऱ्याचे सौंदर्य आणखी वाढवता (Milk Cream Benefits) येते. साय लावण्याचे 5 फायदे - त्वचा मॉइश्चरायझ - स्टाइलक्रेस च्या माहितीनुसार, दुधाच्या सायमध्ये चरबी भरपूर असते, जी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. मलईमध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते. यामध्ये अत्यंत पौष्टिक घटक आणि खनिजे असतात ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि मुलायम बनते. त्वचेची घाण काढून टाकते - साय तुमची त्वचा डिटॉक्स करते. त्वचेतील गोठलेले जंतू काढून टाकून तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी बनवते. मलईमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेची टॅनिंग दूर करतात. नैसर्गिक चमक उन्हात तुमच्या त्वचेवर टॅनिंगची समस्या वाढते, यापासून सुटका मिळवण्यासाठी साय वापरणे हा एक चांगला उपाय आहे. साय तुमच्या त्वचेला पोषण देते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते. हे वाचा -  बद्धकोष्ठतेमुळे राहता त्रस्त? रात्री दुधासोबत प्या हा पदार्थ, त्रास होईल दूर अधिक तरुण दिसाल - कोरड्या आणि निस्तेज त्वचेमुळे तुम्ही वयाने मोठे दिसू लागतात. मलई त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि आपली त्वचा तरुण दिसण्यास मदत करते. त्यामुळे सुरकुत्याही कमी होतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण- मलई तुमच्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. तुम्ही सनस्क्रीन म्हणून वापरू शकता. हे वाचा -  फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैदयकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: skin , skin care
  • First Published :
जाहिरात
जाहिरात