Home /News /lifestyle /

कबुतरप्रेम असावं तर असं! महिन्याकाठी कबुतरांवर तब्बल 4 लाख खर्च करते ही बाई

कबुतरप्रेम असावं तर असं! महिन्याकाठी कबुतरांवर तब्बल 4 लाख खर्च करते ही बाई

दोन कबुतरं तिनं पाळली आहेत. त्यांच्यासाठी खास कपडे शिवले आहेत. त्यांची बेडरूम आहे आणि खास वॉर्डरोबही.

    लंडन, 18 सप्टेंबर : मानव आणि प्राण्यांमधील मैत्रीचे  (Pet love) अनेक किस्से तुम्ही वाचले असतील. कारण प्राचीन काळापासून मानव आणि प्राणी हे सोबत राहत आलेले आहेत. आताच्या आधूनिक जगात मानव आणि प्राण्यांसोबतचा असणारा संबंध जरा निराळा आहे. कारण या दोघांच्या पारंपरिक संबंधात आता मोठं अंतर तयार झालेले आहे. अनेकदा आपल्यासा आपल्या आजूबाजूला कुत्रे, मांजर किंवा पाखरांसोबतची काही लोकांची मैत्रीचे किस्से ऐकायला मिळतात. परंतु आता कबुतरांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या एका महिलेची स्टोरी सध्या सोशल मिडीयावर (VIRAL) होत आहे. त्यात ती आपल्या कबुतरांवर महिन्याकाठी तब्बल 4 लाख रूपये खर्च करत असल्याने त्याची मोठी चर्चा होते आहे. इंग्लंडमध्ये (England) लिंकनशायर (Lincolnshire) येथे राहणारी 23 वर्षीय मेगी जॉन्सन (Meggy Johnson) ला कबुतरं फार आवडतात. याच कारणाणुळे तिने दोन कबुतरं आपल्या घरातच पाळली आहे. ही दोन्ही कबुतरं फार छोटी होती जेव्हा मेगी यांना ती एका ठिकाणी सापडली (Pigeons rescue)होती. तेव्हापासून तिने त्या दोन्ही कबुतरांना आपल्या घरात जागा दिली आहे. VIDEO: इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; अनोखी मैत्री जिंकतीये मनं त्यातल्या एका कबुतराचं नाव हे स्काय (Sky) तर दुसऱ्याचे मूस (Moose) असे ठेवलेले आहे. अगदी आपल्या मुलाप्रमाणे ती आपल्या कबुतरांचे पालनपोषन करते. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार मेगी ही आपल्या कुबतरांवर महिन्याकाठी (Woman spends 4 lakh rupees on pet pigeons) 4000 पौंड म्हणजे जवळपास 4 लाख रूपये खर्च करते. त्यात ती कबुतरांसाठी खास कपडे आणि खाद्यपदार्थ मागवते. त्याचबरोबर त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांना महागडे गिफ्टसुद्धा देते. त्यामुळे आता या महाडी ट्रिटमेंट असणाऱ्या या कबुतरांची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: England, Social media trends, Woman

    पुढील बातम्या