मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Elon Musk Weight Loss Secret : मित्राच्या सल्ल्यानुसार एलन मस्क यांनी कमी केले वजन, काय आहे सिक्रेट?

Elon Musk Weight Loss Secret : मित्राच्या सल्ल्यानुसार एलन मस्क यांनी कमी केले वजन, काय आहे सिक्रेट?

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी नुकतेच सोशल मीडियावर त्यांचे वजन कमी करण्याबाबतचे सिक्रेट शेअर केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई 30 ऑगस्ट : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क हे कोणत्या ना कोणत्या कारणाने जगभरातील लोकांमध्ये चर्चेत असतात. अलीकडेच इलॉन मस्क पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपले वजन कमी केल्याचा उल्लेख करून चर्चेत आले आहेत. ट्विटर खरेदीची घोषणा आणि नंतर डील रद्द केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे वजन कमी करण्याचे रहस्य उघड केले आहे.

एलन मस्क यांनी सांगितले वजन कमी करण्याचे सिक्रेट

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांचे वजन कमी करण्याचे सिक्रेट ट्विटरवर शेअर करत लिहिले की, 'माझ्या चांगल्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी वेळोवेळी उपवास करण्यास सुरुवात केली आणि आता मी स्वतःला खूप निरोगी वाटत आहे.' तसेच मस्क यांनी वजन कमी करण्यासाठी झिरो फास्टिंग अॅपचे कौतुक केले आणि असल्याचेही सांगितले.

हसणं शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर; काय सांगतात संशोधक?

पिरियॉडिकली फास्टिंग म्हणजे काय

स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आजकाल अनेक पद्धती अवलंबल्या जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिरियॉडिकली फास्टिंग. हे जवळजवळ अधूनमधून उपवास करण्यासारखेच आहे. ज्यामध्ये खाण्याची योजना तयार केली जाते. या उपवासात दिवसभरात ठराविक वेळेत जेवण केले जाते आणि उरलेल्या तासांत उपवास केला जातो.

इंटरमिटंट उपवासातील सर्वात लोकप्रिय पद्धत 16:8 आहे. यामध्ये व्यक्ती 8 तासातच खातो-पितो. त्यानंतर उरलेल्या 16 तासात फक्त पाणी पिऊन उपवास केला जातो. याशिवाय अनेक लोक पर्यायी उपवासाचा पर्यायही स्वीकारतात.

मस्क हे SpaceX चे संस्थापक देखील आहेत

एलन मस्क यांना अंतराळाबद्दलही खूप कुतूहल आहे आणि त्यांची इच्छा कोणापासून लपलेली नाही. अवकाशातील जग अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आणि नवीन शोध लावण्यासाठी त्यांनी स्पेस एक्स कंपनीही सुरू केली आहे. 51 वर्षांचे असलेल्या मस्क यांचे दोनदा लग्न झाले आहे आणि ते आपल्या दोन्ही पत्नींपासून घटस्फोटित आहेत. तसेच त्यांना 9 मुले आहेत.

जोडीदाराविषयी आदर कसा व्यक्त कराल? आनंदी आयुष्यासाठी जाणून घ्या टीप्स

विवादांशी संबंध

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा ताज मिळविलेल्या एलन मस्क यांची संपत्ती २५८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. बहुतेकदा वादांमुळे ते चर्चेत असतात. कधी एलन मस्क त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक निर्णयांमुळे चर्चेत ते चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या ट्विटरवरील वादाचे पडसाद संपूर्ण जगात उमटले आहेत. याआधीही ते त्यांच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत होते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss tips