जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : जास्त प्रमाणात पिस्ता खाणे ठरू शकते धोकादायक; होतात गंभीर दुष्परिणाम

Health Tips : जास्त प्रमाणात पिस्ता खाणे ठरू शकते धोकादायक; होतात गंभीर दुष्परिणाम

Health Tips : जास्त प्रमाणात पिस्ता खाणे ठरू शकते धोकादायक; होतात गंभीर दुष्परिणाम

अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पिस्त्यामध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स, अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 असते. पिस्ता पौष्टिक जरी असला तरी याच्या अतिसेवनाने (Side Effects Of Pistachio) अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जून : आपल्याकडे काजू, बदाम, मनुके, पिस्ता असा सुका मेवा (Dry fruits) खायला कुणाला नाही आवडतं ? त्यातल्या त्यात पिस्ता तर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असतो. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पिस्त्यामध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स, अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 असते. पिस्ता पौष्टिक जरी असला तरी याच्या अतिसेवनाने अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात (Side Effects Of Pistachio). आज आम्ही तुम्हाला पिस्त्याचे अतिसेवन केल्यास तुम्हाला कोणत्या गंभीर समस्या होऊ शकतात याबद्दल माहिती देणार आहोत. पिस्ता इतर सुक्या मेव्याप्रमानेच आपण कधीही आणि कितीही प्रमाणात खाऊ शकतो. मात्र पिस्त्याचे दररोज सेवन केल्यास तुमचे वजन वाढवण्याची शक्यता असते (Weight Gain). त्यामुळे जास्त वजन असणाऱ्या लोकांनी पिस्त्याचे सेवन अगदी माफक प्रमाणात करावे.

Garlic Benefits : रात्री झोपताना उशीखाली जरूर ठेवा लसूण; बहुगुणी लसणाचा हा फायदा तुम्हाला माहिती नसेल

भाजलेल्या पिस्त्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते आणि मिठाच्या म्हणजेच सोडियमच्या अतिसेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो. पिस्त्याच्या अतिसेवनामुळे हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure) होण्याचीदेखील शक्यता असते. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतु जास्त फायबरदेखील आपल्यास शरीरासाठी चांगले नसते. त्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि पोटात वेदना होऊ शकतात.

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

पिस्त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि जास्त प्रमाणात पोटॅशियम शरीरात गेल्यास आपल्याला किडनीचे आजार उद्भवू शकतात. पिस्त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मळमळ, अशक्तपणा आणि अनियमित हृदयाचे ठोके असा त्रासदेखील होऊ शकतो. त्यामुळे पिस्त्याचे सेवन प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात