जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मानसिक ताण प्रचंड वाढतोय! स्ट्रेस कमी करण्यासाठी असा घ्या समतोल आहार

मानसिक ताण प्रचंड वाढतोय! स्ट्रेस कमी करण्यासाठी असा घ्या समतोल आहार

मानसिक ताण कमी करण्याचे उपाय

मानसिक ताण कमी करण्याचे उपाय

काही कारणाने किंवा विनाकारण येणाऱ्या ताण-तणावाला वेळीच ओळखले पाहिजे. एका संशोधनानुसार आजघडीला तब्बल 74 टक्के लोक तणावग्रस्त आहेत. ताण-तणाव येणारच म्हटल्यावर त्याला घालवण्याचे उपायही शोधावे लागतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर : आजच्या युगात जगण्यालाच धकाधकीचं जगणं म्हटलं जातं. यात तणाव येणं (stress) सगळ्यांच्याच जणू पाचवीला पुजलेला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका संशोधनानुसार आजघडीला तब्बल 74 टक्के लोक तणावग्रस्त आहेत. ताण-तणाव येणारच म्हटल्यावर त्याला घालवण्याचे उपायही शोधावे लागतील. ताण घालवण्याच्या अनेक उपायांपैकी एक म्हणजे काही पदार्थ खाणं आणि विशिष्ट जीवनशैली फॉलो करणं. हा उपाय रामबाण असल्याचं संशोधनासह अनेकांच्या अनुभवातूनही समोर आलं आहे. कसा असावा दिवसभराचा आहार? सकाळच्या नाश्त्यामध्ये फळं, विविध शेंगांचे दाणे आणि सुक्यामेव्यांचा समावेश करावा. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या खाव्यात. झोपण्याआधी किमान दोन-तीन तासांपूर्वी जेवण करावं आणि डॉक्टरांनी दिलेली असतील तर, वेळेवर औषधं घ्यावीत. ही आयुर्वेदिक वनस्पती आहे उपयोगी आयुर्वेदात शतावरी वनस्पती ताण कमी करण्यास उपयोगी पडते, असं सांगितलं आहे. या वनस्पतीच्या मुळांना आयुर्वेदात अमृताचा दर्जा दिलेला आहे. या वनस्पतीला विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जेवणात भरपूर प्रमाणात असावेत फायबर्स दलिया, ओट्स, सफरचंद, संत्री यांच्यात तंतुमय पदार्थ अर्थात फायबर्स खूप असतात. आरोग्यतज्ज्ञ सांगतात त्यानुसार शरीरात फायबर्स जाणं खूप गरजेचं आहे. यातून पचनाच्या समस्या दूर राहतात. शरीराचं पाचक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं सांगितलं जातं. अशावेळी पचनस्व्यास्थ्याला मजबूत बनवणारे खाद्यपदार्थ आहारात आधिकाधिक असले पाहिजेत. हर्बल चहा प्या मानसिक स्वास्थ्याला चांगलं बनवण्यासाठी खास प्रकारचे चहासुद्धा उपयोगी ठरतात. चांगली झोप लागण्यासाठीही असा चहा प्रभावी ठरतो. मोरिंगा चहा किंवा जास्वंदीच्या फुलापासून बनलेला चहा पिणं तणाव आणि डिप्रेशनला कमी करतं. हे वाचा -  उभे राहण्याचे ‘हे’ आहेत फायदे! टाळू शकता हृदयरोग स्वत:मधल्या ताणाला वेळीच ओळखत तुम्ही त्याला निष्प्रभ करण्यासाठी या सोप्या गोष्टी फॉलो करू शकता. अर्थात, ताण जास्त वाढला तर डॉक्टरांचा सल्लाही घेणे गरजेचे आहे. हे वाचा -  रात्री हे पदार्थ खाल्ल्याने उडते झोप आणि पडतात वाईट स्वप्न (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात