जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उभे राहण्याचे 'हे' आहेत फायदे! टाळू शकता हृदयरोग

उभे राहण्याचे 'हे' आहेत फायदे! टाळू शकता हृदयरोग

उभं राहण्याचे फायदे

उभं राहण्याचे फायदे

बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, की मुळात उभं राहणं हादेखील शरीराचा एक व्यायामच आहे. उभं राहण्याचे फायदे आपण जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 डिसेंबर :  सध्याच्या काळात मानवाची जीवनशैली खूप बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व कामं खूप सुलभ झाल्यामुळे शारीरिक व्यायाम कमी प्रमाणात होतो. अनेकांच्या कामाचं स्वरूप असं असतं, की त्यांना दिवसाचे 8-9 तास खुर्चीवर बसून काम करावं लागतं. परिणामी शरीराची हालचाल जास्त होत नाही. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्याला माहिती आहे, की नियमित व्यायाम केल्याने शारीरिक स्वास्थ चांगले राहतं. अन्नातून शरीराला वेगवेगळी पोषक तत्त्वं मिळतात, संगीत ऐकल्याने मनाला आराम मिळतो, तसंच नियमित व्यायाम केल्याने आपल्या आरोग्यास फायदा होतो; पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, की केवळ उभं राहिलं तरी आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं, की मुळात उभं राहणं हादेखील शरीराचा एक व्यायामच आहे. उभं राहण्याचे फायदे आपण जाणून घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. हेही वाचा - Weight Loos Tips : वजन कमी करायचंय? मग रात्रीच्या आहारात सामील करा हे पदार्थ अतिरिक्त चरबी कमी होते बसून राहिल्याने आपल्या शरीरातली चयापचयाची प्रक्रिया मंदावते व त्यातून हळूहळू चरबी वाढते आणि लठ्ठपणा येतो. याउलट, उभं राहिल्याने आपल्या शरीरातली चयापचयाची प्रक्रिया चांगली राहते व चरबी लवकर खर्च होते. हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात तुम्ही दिवसभर एखाद्या ठिकाणी बसून काम करत असाल, तर लठ्ठपणाची शक्यता जास्त असते. आपल्याला चांगलंच माहिती आहे, की लठ्ठपणा हृदयाशी संबंधित आजारास कारणीभूत ठरतो. उभं राहून काम केलं, तर मधुमेह, कोलेस्टेरॉल व वजन नियंत्रणात राहतं. परिणामी हृदयरोगाची शक्यता कमी होते. कंबरदुखीपासून सुटका दिवसाचे अनेक तास एकाच ठिकाणी बसून राहत असाल, तर अशा परिस्थितीत कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. उभं राहिल्याने आपले स्नायू कार्यरत राहतात व त्यामुळे कंबरदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. लठ्ठपणा कमी करण्यात मदत बसून राहण्याऐवजी उभं राहिल्याने आपलं शरीर जास्त कॅलरीज बर्न करतं. कारण उभे राहिल्यावर आपले स्नायू जास्त कार्यरत राहतात. अशा प्रकारे उभं राहण्याचा हा साधा व सोपा व्यायाम आपण नियमित केला पाहिजे व आपलं आरोग्य उत्तम ठेवलं पाहिजे. हा व्यायाम तसा फार सोपा आहे आणि याचे फायदे खूप आहेत. उभं राहून काम केलं, तर मोठमोठे आजार आपण टाळू शकतो व आरोग्यदायी जीवन आनंदाने जगू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात