मुंबई, 28 सप्टेंबर : शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आता लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. व्यायाम करतात, खाण्यापिण्याकडे लक्ष देतात, डाएटिंगदेखील करतात. या सर्व गोष्टी करण्यामागे स्वस्थ, निरोगी शरीर हाच हेतू असतो आणि यासाठी महत्वाचं असतं आपलं वजन नियंत्रित राहणं. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला व्यायामसोबत डाएटदेखील व्यवस्थित पाळावे लागते. डाएट करताना आपल्याला असंख्य प्रश्न असतात. हे खावं की नाही? ते खाल्याने काय होतं? याचा फायदा होईल का? त्यामुळे नुकसान होईल का? आणि असाच एक प्रश्न असतो मॅगीविषयी. मॅगी हा जवळ जवळ सर्वाना आवडणारा पदार्थ आहे. त्यामुळे डायेटदरम्यान मॅगी खावी की नाही हा प्रश्नही पडतो. तुमच्या या प्रश्नच उत्तर न्यूट्रिशनिस्ट सिमरत कथुरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिले आहे.
नवरात्रीचा उपवास केलाय? या गोष्टींचा आहारात करा समावेश, नाही वाटणार अशक्तपणाडाएटदरम्यान मॅगी खावी की नाही? मॅगीच्या एका सर्व्हिंगमध्ये 205 कॅलरीज असतात. तर 9.9 ग्रॅम प्रोटिन्स आणि 131 कार्बोहायड्रेट्स असतात. मॅगीमध्ये इतर स्नॅक्सच्या तुलनेत कमी कॅलरी असतात. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात मॅगीचा वापर करू शकता.
मॅगी खाण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे मॅगी हे एक लोकप्रिय आणि सोपं जेवण आहे. मात्र हा सर्वात आरोग्यदायी अन्न पर्याय नाही. मॅगीमध्ये कोणतेही जीवनसत्त्वे, आहारातील फायबर किंवा खनिजे नसतात. मॅगीमध्ये शेल्फ लाइफ आणि चव वाढवण्यासाठी अधिक रसायने टाकलेली असू शकतात. मॅगीमध्ये चरबी, कर्बोदके आणि मीठाचे प्रमाण जास्त असते.
मॅगीच्या चवीमुळे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात. मॅगीमध्ये प्रोटिन्स आणि फायबर नसल्यामुळे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा योग्य अन्न पर्याय नाही. महिन्यातून 1-2 वेळा मॅगी खाणे योग्य.
डाएटदरम्यान तुम्ही मॅगी खाऊ शकता. मात्र याचा तुमच्या शरीराला काहीही फायदा होणार नाही. कारण मॅगीची न्यूट्रिशन व्हॅल्यू नगण्य आहे.

)







