जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा...

तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा...

तुम्हीही नवरात्रीचे उपवास करताय? मग 'हे' पदार्थ कधीच खाऊ नका; अन्यथा...

अनेकजण श्रद्धेने उपवास करतात; पण उपवासाच्या काळात कोणत्या पदार्थांचं सेवन करावं आणि करू नये याची अनेकांना पुरेशी माहिती नसते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई,  26 सप्टेंबर:   यंदा 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू झालं आहे. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा-अर्चा केली जाते. नवरात्रात अनेक जण नऊ दिवस अनवाणी पायांनी प्रवास करतात. अनेकजण श्रद्धेने उपवास करतात; पण उपवासाच्या काळात कोणत्या पदार्थांचं सेवन करावं आणि करू नये याची अनेकांना पुरेशी माहिती नसते. त्याबद्दल अधिक माहिती घेऊ या. याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. वर्षातून चार वेळा नवरात्र येतं. त्यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. यासाठीच अनेक भक्त सलग नऊ दिवस उपवास करतात. काही जण दोन दिवस उपवास करतात. शास्त्रानुसार अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा करणारे भक्त पहिल्या आणि सातव्या दिवशी उपवास करतात. तसंच नवमीची पूजा करणारे पहिल्या आणि आठव्या दिवशी उपवास करतात. काहीजण शेवटचे दोन दिवस उपवास करतात. नवरात्रात प्रत्येकजण यथाशक्ती व्रतवैकल्य आणि उपवास करतात. यातले काही जण सर्व नऊ दिवस फक्त पाणी पिऊन बाकी पूर्ण उपवास करतात. काही जण एकदाच जेवतात. यासाठीच उपवास करणार्‍यांनी काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. या काळात आहार कसा असावा हे जाणून घेणं गरजेचं आहे. फलाहार नवरात्रातल्या उपवासात फळं खाणं उपयुक्त ठरू शकतं. अनेकजण या उपवासात केवळ फलाहारदेखील करतात. दुर्गामातेच्या भक्तीत व्हा तल्लीन, नवरात्रीनिमित्त व्हॉट्सअपला ठेवा हे स्टेटस

    पीठ आणि धान्य

    गहू आणि तांदूळ खाणं हे नवरात्रीच्या किंवा सर्वसाधारणपणे कोणत्याही उपवासांमध्ये वर्ज्य असतं. त्यामुळे शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिरा पिठापासून बनलेले पदार्थ खाता येतील. तसंच भाताऐवजी वरी तांदूळ शिजवून खावेत. साबुदाण्यापासून बनलेला कोणताही पदार्थ खावा. मसाले आणि हर्ब्ज नवरात्रात उपवासासाठी नेहमीचं मीठं म्हणजेच पांढरं मीठ वापरत नाहीत. यासाठी सैंधव मीठ अर्थात काळ्या मीठाचा वापर करावा. तसंच जेवणात मसाले वापरताना केवळ जिरं, जिर्‍याची पावडर, काळ्या मिरीची पावडर, वेलची, लवंग, दालचिनी, ओवा, डाळिंबाचे सुकलेले दाणे, आमसूल, चिंच आणि जायफळ हे पदार्थ घेऊन चालतात. भाज्या बटाटे, रताळी, अळू, अळकुडी, सुरण, लिंबू, टोमॅटो, पालक, दुधी, काकडी किंवा गाजर आदी भाज्या उपवासाच्या काळात खाऊन चालतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नवरात्रातल्या उपवासाच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं चालतं. दही, पनीर, लोणी, तूप, साय, खवा आदी पदार्थ जरूर खावेत. काय खाणं टाळावं कांदा आणि लसूण उपवास काळात खाणं निषिद्ध मानलं गेलंय. या काळात बीन्स, डाळ, तांदळांचं पीठ, मक्याचं पीठ, मैदा, गव्हाचं पीठ, रवा आदी बाबी टाळाव्यात. मांसाहार आणि अंडी खाणं, दारू पिणं आणि सिगरेट ओढणं आदी बाबीही या काळात टाळाव्यात. चहा-कॉफी घेणं टाळा अनेक जण उपवासात सतत चहा-कॉफी पितात. ते शरीराला हानिकारक आहे. अति चहा-कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. याऐवजी शहाळ्याचं पाणी, लिंबू सरबत, ताक, मिल्कशेक आदी आहारात असावं. संतुलित आहार घ्यावा. अनेकदा उपवासाच्या काळात तळलेले पदार्थ खूप खाल्ले जातात. त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. उपवासात भूक लागल्यास मखाणा, भुईमुगाच्या शेंगा, उकडलेलं रताळं किंवा सुका मेवा आदी पदार्थ खावेत. नातं अधिक घट्ट करण्यासाठी अशी द्या भावनेला बुद्धीची जोड, फॉलो करा सिम्पल टिप्स साखर मर्यादित

    खीर किंवा हलवा तयार करताना रिफाइंड साखरेचा वापर कमी करावा. त्याऐवजी मध, खजूर आदींचा वापर करावा.

    बटाट्याचे तळलेले पदार्थ खाणं टाळा; फलाहार करा उपवास काळात तळलेल्या पदार्थांचं सेवन शक्यतो टाळावं. तळलेले पदार्थ तोंडाला चव आणतात; पण त्यामुळे पोटाच्या समस्या डोकं वर काढू शकतात. यासाठीच बटाट्याचे तळलेले पदार्थ न खाता फलाहार करणं योग्य राहील. उपवास काळात सगळ्यांनीच तब्येतीची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी संतुलित आहार घ्यावा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात