दिल्ली, 05 ऑगस्ट : हिरवट पिवळ्या रंगाचे आतून पांढरा किंवा गुलाबी गर असणारे पेरू (Guava) खायला खूप गोड असतात. पेरू खूप सहज मिळणारं फळ (Fruit) आहे. अनेक जणांच्या बागेतही पेरुची झाडं (Guava Tree) लावलेली असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना त्यांच्या फायद्याविषयी (health Benefits of eating guava) माहिती नसते. पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन आणि खनिजं (Vitamins & Minerals) शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. पेरू रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) अधिक मजबूत करतात. पचनक्रियेसाठी (Digestion) पेरू हे सर्वोत्तम फळ आहे. लहान मुलांच्या पोटात जंत होत असतील तर त्यासाठी पेरू हे एक खूप उत्तम फळ आहे. एका संशोधनानुसार पेरूची पानं सुद्धा औषधी आहेत.
पेरूची चटणी, पेरूचा सॉस किंवा कच्चा पेरू देखील आवडीने लोक खातात. पण, सर्रास सगळ्यांसाठीच पेरू फायदेशीर नसतो काही आजारांमध्ये पेरू खाल्ल्यास त्रास होतो.
पेरूमध्ये अॅन्टीऑक्सिडन्ट, व्हिटॅमीन सी, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. पेरू मध्ये 112 कॅलरी आणि 23 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स 9 ग्रॅम फायबर आणि स्टार्च असतं. संशोधनानुसार डायबिटीसच्या रुग्णांना पेरू खाणं फायदेशीर आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतं. तर, फॉलेट असिड, बीटा कॅरोटीन सारखे पौष्टिक घटक असतात. मात्र, काही लोकांना पेरू न खाण्याचा सल्ला दिला जातो.
(चुंबक रोखणार नको असलेली प्रेग्नन्सी; पुरुषांसाठी नवं गर्भनिरोधक)
पोटाचे आजार
पेरूमध्ये व्हिटॅमीन सी आणि फ्रॅक्टोज असतं. हे दोन्ही घटक पोट दुखण्याचा त्रास वाढवू शकतात. ज्यांना पोटाचा त्रास असतो त्यांनी पेरू खाऊ नये. यामध्ये 40 % फ्रॅक्टोज असतं. जे शरीरात लवकर अॅबजॉर्ब होत नाही आणि त्यामुळे पोट फुगण्याची समस्या आणखीन वाढू शकते. याशिवाय झोपण्याआधी पेरू खाल्यास पोट फुगू शकतं.
(Research: महिलांना नाही आवडतं पैसा,बंगला; पुरुषांच्या‘या’खास गोष्टी करतात आकर्षि)
इरिटेबल बाऊल सिंड्रोम
पेरूमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं ज्यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. मात्र जास्त प्रमाणामध्ये पेरू खाल्ला तर त्याचा उलटा त्रास होऊ शकतो ज्यांना इरिटेबल बाऊल सिंड्रोम आहे त्यांनी पेरू प्रमाणामध्ये खावा. नाहीतर लूज मोशन्स किंवा अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
(आपल्याच वाईट सवयी देतात डोकेदुखीला आमंत्रण; थोडा बदल संपवेल कायमचा त्रास)
डायबेटिसच्या रुग्णांनी खाऊ नये
यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांसाठी पेरू खाणं अत्यंत फायदेशीर आहे. मात्र पेरू खायला सुरुवात करण्याआधी आपली ब्लड शुगर लेव्हल तपासायला हवी. कारण 100 ग्रॅम आकाराच्या पेरूमध्ये 9 ग्रॅम नैसर्गिक साखर असते. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. म्हणूनच डायबेटिसच्या रुग्णाने देखील पेरू प्रमाणामध्ये खावा.
(सौंदर्यात भर घालणाऱ्या लिपस्टिकमुळे होतो कॅन्सर; विकत घेताना जरूर तपासा केमिकल)
जास्त प्रमाणात पेरू खाल्ल्याने लठ्ठपणा देखील वाढू शकतो.
पेरू खाण्याची योग्य वेळ
दिवसभरात कधीही पेरू खाऊ शकता मात्र, एकावेळी एकच पेरू खावा. वर्कआउटच्या आधी किंवा नंतर पेरू खाल्ला तर जास्त फायदा मिळतो. पण रात्रीच्या वेळी पेरू खाल्ला तर, यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fruit, Health Tips, Lifestyle