लिपस्टिक बनवण्यासाठी केमिकल वापरले जातात. त्यात आपल्या ओठांवर थेट लागत असल्यामुळे पोटातही जाऊ शकते आणि यातल्या केमिकल्समुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो.लिपस्टिक बनवण्यासाठी केमिकल वापरले जातात. त्यात आपल्या ओठांवर थेट लागत असल्यामुळे पोटातही जाऊ शकते आणि यातल्या केमिकल्समुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
यातील मॅग्नीज, कॅडमियम, क्रोमियम आणि ॲल्युमिनियम यासारखे घटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहेत. त्यामुळे लिपस्टिक लावलेल्या ओठांनी आपण जेव्हा जेवतो त्यावेळेस हे पदार्थ आपल्या अन्नपदार्थ बरोबर पोटात जाण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे लिपस्टिक घेताना त्यात कोणते केमिकल आहेत हे नक्की जाणून घ्या. लिपस्टिकमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लिड म्हणजेत शिसं वापरलं जातं. लिड शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे.
लिपस्टिकमधील केमिकलमुळे हायपर टेन्शन किंवा हृदयाशी संबंधित त्रास होऊ शकतात. लिपस्टिक बनवताना विविध प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढतो.
लिपस्टिकमध्ये बिस्मत ऑक्सीक्लोराईड नावाचा प्रिझर्वेटिव्ह वापरला जातो. यामुळे ही कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. शिवाय या केमिकल मुळे ऍलर्जी होऊ शकते.
गर्भवती महिलांनी लिपस्टिक वापरू नये. काही कारणास्तव लावायची असेल तर चांगली ब्रँडेड लिपस्टिक लावावी. शक्यतो हर्बल लिपस्टिकचा वापर करावा.
लिपस्टिक खरेदी करताना त्यामध्ये कोणते केमिकल्स वापरलेत त्याची माहिती घ्यावी.लिपस्टिक खरेदी करताना त्यामध्ये कोणते केमिकल्स वापरलेत त्याची माहिती घ्यावी.स्वस्तातली लिपस्टिकचा खरेदी करू नका. कारण यामध्ये चांगल्या प्रतीचे केमिकल्स वापरले असतीलच असं नाही. ब्रॅन्डेड लिपस्टिक घेताना त्यातले इनग्रेडिएन्ट जरूर पहा.
डार्क शेडच्या लिपस्टिकमध्ये हेवी मेटल्स वापरले जातात. त्यामुळे शक्यतो लाईट शेडची लिपस्टिक वापरावी.