बीजिंग, 04 ऑगस्ट : नको असलेली गर्भधारणा (Contraception) रोखण्यासाठी पुरुषांकडे (Male Contraception) दोन मार्ग आहेत एक म्हणजे कंडोमचा वापर आणि दुसरं म्हणजे नसबंदी. पण आता पुरुषांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शास्त्रज्ञांनी चुंबकाद्वारे गर्भनिरोध करण्याचा मार्ग शोधला आहे. ज्यात चुंबकामार्फत स्पर्म कंट्रोल होऊ शकतात.
चिनी शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधकाचा आणखी एक पर्याय आणला आहे. शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठी रिव्हर्सिबल चुंबकीय बायोडिग्रेडेबल नॅनोमटेरियल्स विकसित करण्यात आले आहेत. जे कमीत कमी 30 दिवस काम करतात. नॅनो लेटर्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
उंदरांवर याचा यशस्वी प्रयोग झाला आहे. संशोधनकांनी बायोडिग्रेडेबल आयर्न ऑक्साइड नॅनोपार्टिकल्सच्या दोन रूपांचं परीक्षण केलं. चुंबकासोबत हे गरम करता येऊ शकतं. एका नॅनोपार्टिकलवर पॉलिइथाइलिन ग्लाइकॉल आणि दुसऱ्यावर साइट्रिक अॅसिडचा लेप लावण्यात आला. पॉलिइथाइलिन ग्लाइकॉल नॅनोपार्टिकलला उच्च तापमानावर गरम करता येऊ शकतं, पण साइट्रिक अॅसिडच्या तुलनेत याला सहजपणे तोडता येऊ शकत नाही, असं संशोधकांना दिसलं.
हे वाचा - वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster
संशोधकांनी दोन दिवस उंदरांना साइट्रिक अॅसिड नॅनोपार्टिकल इंजेक्शन किती तरी वेळा दिलं, त्यानंतर चुंबकासोबत याचा प्रयोग करण्यात आला. नॅनोपार्टिकलवर 15 मिनिटांसाठी चुंबक लावण्यात आला. त्यानंतर 104 डिग्री फारेनहाइट तापमानावर गरम करण्यात आलं.
संशोधकांनी दिसून आलं की उंदरांमधील शुक्राणू जवळपास 30 दिवस आकुंचित झाले. त्यानंतर हळूहळू स्पर्म निर्मितीत सुधारणा झाली. प्रयोगाच्या सातव्या दिवशी मादी उंदरातील प्रेग्नन्सी थांबली. तर साठाव्या दिवशी त्यांची प्रेग्नन्सी क्षमता परत येऊ लागली. नॅनोपार्टिकल्स पेशींसाठी हानिकारक नाही आणि ते सहजपणे शरीरातून बाहेर काढता येऊ शकतात, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.
हे वाचा - पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा
हे गर्भनिरोधक अशा पद्धतीने तयार करण्यात आलं आहे, ज्याचा परिणाम काही दिवसांनी आपोआप नष्ट होईल. तसंच बायोडिग्रेजेबल असल्याने ते आपोआप नष्ट होईल. गर्भनिरोधनासाठी हे फक्त एक किंवा दोन महिन्यांपर्यंत गरम करण्याची गरज असेल. खूप वेळ याचा परिणाम राहत नसल्याने आवश्यक तेव्हा याचा वापर करता येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy, Sex, Sexual health