Home /News /national /

'रण'रागिणीला सॅल्युट! अंगाची लाही लाही होत असतानाही बेशुद्ध वृद्धेला घेतलं पाठीवर; रणरणत्या वाळवंटात जीव वाचवण्यासाठी धडपड

'रण'रागिणीला सॅल्युट! अंगाची लाही लाही होत असतानाही बेशुद्ध वृद्धेला घेतलं पाठीवर; रणरणत्या वाळवंटात जीव वाचवण्यासाठी धडपड

रणरणत्या वाळवंटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृद्ध महिलेला उपचार मिळावेत यासाठी लेडी पोलिसाची धडपड.

    कच्छ, 23 एप्रिल : रणरणत्या उन्हात आपण साधं चाललो तरी जीव अगदी नकोसा होता. विचार करा वाळवंटात काय अवस्था होत असेल. डोक्यावर आग ओकणारा सूर्य, पायाखाली चटके देणारी वाळू, अंगावरून वाहणाऱ्या घामाच्या धारा... फक्त विचार करूनच घाम फुटला आहे. पण अशा अंगाची लाही लाही करणाऱ्या अशा परिस्थितीतही एका महिला पोलिसाने एका वृद्ध महिलेला आपल्या पाठीवर घेत रणरणतं वाळवंट पायी पार केलं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तिने धडपड केली (Lady police take old woman on bakc in kutch). पूर्व कच्छमधील खादिर रेगिस्तानातील भंजदा डोंगरावर एक वृद्ध महिला बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी नेण्यासाठी  महिला पोलिसाने तिला आपल्या पाठीवर घेतलं. या कर्तव्यनिष्ठ आणि माणुसकी जपणाऱ्या महिला पोलिसाचा व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून तुम्हीही या महिला पोलिसाला तुम्ही सॅल्युट केल्याशिवाय राहणार नाही. हे वाचा - धक्कादायक! पाळीव श्वानाला वाचण्यासाठी घेतली नदीत उडी; कुत्रा वाचला मात्र महिलेसोबत घडलं विपरीत खादिरच्या धोलावीरापासून 10 किमी दूर असलेल्या भंजदा दादा मंदिरात मोरारी बापूंच्या रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं. नव्या  भंजदा दादा मंदिरापासून 5 किमी दूर एका उंच डोंगरावर जुनं भंजदा दादा मंदिर आहे. त्यामुळे मोरारी बापूंची रामकथा ऐकण्यासाठी आलेले भाविक या मंदिरातही जात होते. एका 86 वर्षांच्या महिलेलाही त्या मंदिरात दर्शन करण्याची इच्छा होती. त्यामुळे तीसुद्धा तिथं गेली. डोंगरावर चढताना अर्ध्या रस्त्यातच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. रामकथेचं आयोजन केल्यानं परिसरात पोलीसही तैनात होते. रापर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वर्षाबेन माजीवाभाई परमार यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्या तात्काळ महिलेपर्यंत पोहोचल्या. त्यांनी लगेच या महिलेल्या आपल्या पाठीवर घेतलं आणि वाळवंटात पायी तिला उपचारासाठी घेऊन निघाल्या. तब्बल पाच किलोमीटर त्या चालल्या. महिलेवर त्यांनी उपचार करवून घेतलं आणि उपचार झाल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा भंजद दादा मंदिरात सोडलं. हे वाचा - मोठ्या माणसाचा साधेपणा! Zoho च्या अब्जाधीश सीईओंनी माती आणि गवतापासून उभारलं अनोखं ऑफिस पूर्व कच्छचे पोलीस प्रमुख महेंद्र बगडिया यांनी महिला पोलिसाचं कौतकुक केलं आहे. रापर पोलीस निरीक्षक एम.एन राणा यांनी पोलीस सेवेसाठी सैदव तत्पर असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Rajasthan, Viral, Viral videos

    पुढील बातम्या