मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /International Beer Day : जाणून घ्या बिअर पिण्याचे 10 फायदे

International Beer Day : जाणून घ्या बिअर पिण्याचे 10 फायदे

मजा मस्ती तर आहेच, मात्र बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर (Health Benefits of Beer) ठरतं. पाहूयात बिअर पिण्याचे दहा फायदे –

मजा मस्ती तर आहेच, मात्र बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर (Health Benefits of Beer) ठरतं. पाहूयात बिअर पिण्याचे दहा फायदे –

मजा मस्ती तर आहेच, मात्र बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर (Health Benefits of Beer) ठरतं. पाहूयात बिअर पिण्याचे दहा फायदे –

    मुंबई 6 ऑगस्ट: दरवर्षी ऑगस्टचा पहिला शुक्रवार हा आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस आज, म्हणजेच सहा ऑगस्ट 2021 ला आला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि चिल्ड बिअर (Beer Health Benefits) हे समीकरण बऱ्याच जणांचं आवडतं असतं. अगदी कधीतरीच मद्यपान करणारेही अशा वेळी बिअरला नाही म्हणत नाहीत. मित्रांचं रियुनियन असो वा एखादी पार्टी, या सगळ्याला बिअर आणखीच रंगत आणते. त्यात एखाद्या मित्राला थोडीशी जास्त झाली तर त्याचे किस्सेही धमाल उडवतात. मजा मस्ती तर आहेच, मात्र बिअर प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यालाही बऱ्याच प्रमाणात फायदेशीर (Health Benefits of Beer) ठरतं. पाहूयात बिअर पिण्याचे दहा फायदे –

    दीर्घायुष्य

    प्रमाणात दारु पिणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं बिअर हा त्यासाठीचा सर्वात चांगला पर्याय (Beer Drinking benefits) आहे. अर्थात, हे पिणं प्रमाणाबाहेर गेल्यास त्याचा दुष्परिणामही होतोच. अति मद्यपानामुळे कॅन्सर, लिव्हर इन्फेक्शन असे गंभीर आजार होऊ शकतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण, एका अहवालात असंही समोर आलं आहे, की अगदीच दारू न घेणंही आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे प्रमाणात मद्यपान करणारे हे जास्त पिणाऱ्यांच्या किंवा अगदीच न पिणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काळ जगतात (Beer drinking increases lifespan) असं एका अभ्यासात समोर आलं आहे. वाईन किंवा इतर लिकर्सच्या तुलनेत यासाठी बिअर हाच सर्वात चांगला पर्याय आहे.

    डायबेटीजसाठी उत्तम फळ आहे पेरू; पण या आजारांत ठरू शकतो घातक, वाचा कधी खावा कुणी टाळावा?

    हृदयविकाराचा धोका टळतो

    प्रमाणात बिअर पिणाऱ्यांना हृदयविकार होण्याचा धोका हा इतर लोकांपेक्षा 20 ते 40 टक्के कमी (Beer reduces risk of heart disease) असतो, असंही एका अभ्यासात समोर आलं आहे.

    स्मरणशक्ती वाढते

    बिअरमधील अँटी ऑक्सिडंट्स हे मेंदूतील पेशींचे ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवतात. यामुळे अल्झायमरचा धोका कमी होतो. म्हणजेच, बिअरमुळे स्मरणशक्ती (Beer increases memory) वाढण्यास मदत होते.

    Gardening Tips: कशाला जायचं बाजारात? ‘या’ टिप्स वापरून घरी करा बटाट्याचं उत्पादन

    अँटी-इनफ्लेमेटरी प्रॉपर्टीज

    बिअरमध्ये xanthohumol नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील दाहविरोधी आणि संसर्ग रोखणारा आहे. म्हणजेच तुम्हाला एखादी मोठी जखम झाली, तर त्यावर बिअर ओतल्यास (Apply Beer on wound) तिथे होणारी जळजळ कमी होते. तसेच, गँगरिन होण्याचा धोकाही टळतो.

    हाडे होतात मजबूत

    बिअरमध्ये सिलिकॉन, व्हिटॅमिन बी आणि बायोअक्टिव्ह पॉलीफेनॉल्स आढळून येतात. हे सर्व घटक आपल्या हाडांना मजबूत (Beer makes bones strong) बनवण्यासाठी मदत करतात.

    भरपूर न्यूट्रियंट्स

    बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि लिपोप्रोटिन्स असतात. हे HDL प्रोटीन्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. म्हणजेच, बिअर प्यायल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल (Beer decreases cholesterol) कमी होण्यास मदत होते.

    तुलनेने कमी डिहायड्रेशन आणि हँगओव्हर

    लिकर घेताना एन्जॉय होतं. मात्र, दुसऱ्या दिवशी येणारा हँगओव्हर कोणालाच नको असतो. बिअर पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, इतर लिकर्सच्या तुलनेत बिअरमुळे डिहायड्रेशन आणि हँगओव्हर (Beer causes less dehydration) होण्याची शक्यता कमी असते. मात्र, तरीही खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.

    अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज

    बिअरचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, त्यातील xanthohumol. शरीरातील कॅन्सरला पूरक असणाऱ्या एन्झायम्सना लढा देणारा हा घटक बिअरमध्ये (Beer has anti-cancer properties) मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो.

    कॅलरीज कमी असतात

    आपल्या डाएटकडे लक्ष देणाऱ्यांसाठीही बिअर फायद्याची असते. इतर हार्ड ड्रिंक्सच्या तुलनेत बिअरमध्ये अगदी कमी अल्कोहोल कंटेंट, तसेच कमी कॅलरीज असतात. साधारणपणे बिअरमध्ये 4 ते 6 टक्के अल्कोहोल असते. हे प्रमाण (Alcohol content in Beer) त्या-त्या ब्रँडनुसार बदलते. तर बिअरच्या एका पिंटमध्ये 208 कॅलरीज (Calories in Beer) असतात.

    किडनी स्टोन निघून जातो

    बिअर प्यायल्याने किडनी स्टोन, म्हणजेच मुतखडा निघून जातो ही केवळ अफवा नाही तर खरंच आहे. बिअरमुळे या खड्यांचे छोटे तुकडे होतात, आणि ते युरिनवाटे निघून जातात. त्यामुळे कित्येक डॉक्टरही किडनी स्टोन (Beer Cures Kidney stone) असणाऱ्यांना बिअर पिण्याचा सल्ला देतात. पण म्हणून थेट बिअर पिण्यास सुरुवात न करता, अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

    First published:
    top videos

      Tags: Beer, Health Tips