नवी दिल्ली, 20 एप्रिल: आपल्याला बरेचदा असं वाटत राहतं की, लहान मुलं एकदम आनंदी असतात. तसंच काहीसं आपल्याला ज्येष्ठांबाबतही वाटतं. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींवर विशेष अशा जबाबदाऱ्या नसतात, त्यामुळे या वयोगटातील व्यक्ती अगदी आनंदी असतील असं आपल्याला वाटत राहतं. मात्र, ही बाब चुकीची असल्याचं एका रिसर्चमधून (Research about happiest age group) समोर आलं आहे. सोशल इंडिकेटर्स रिसर्च जर्नलमध्ये (Social Indicators Research) याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये माणूस कोणत्या वयात असताना सर्वाधिक आनंदी असतो, (This is the age we are at our happiest) याबाबतचा अभ्यास करण्यात आला. असा केला रिसर्च या रिसर्चसाठी युरोपातील 13 देशांमधील लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. सर्व सहभागी लोक हे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. या सर्वांना आपल्या आयुष्यातील सर्वांत आनंदी काळ कोणत्या वयात अनुभवला, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांचे विश्लेषण करून संशोधकांनी माणसांचे सर्वांत आनंदी असण्याचे सरासरी वय (Happiest age) निश्चित केलं. तिशीत माणसं असतात सर्वांत आनंदी या रिसर्चचे प्रमुख बेगोना अल्वारेज (Begoña Álvarez) यांनी सांगितलं की, 30 ते 34 वर्षे या वयोगटातील (Happiest age group) व्यक्ती सर्वाधिक आनंदी होत्या, असं संशोधनात आढळलं. माणसांचा आनंद हा वयोगटानुसार वाढत वा कमी होत जातो. लहानपणापासून तिशीपर्यंत माणसाच्या आनंदाचा आलेख हा चढता असतो. त्यानंतर चाळीशीपासून तो पुन्हा खाली उतरत जातो, असं या अभ्यासातून समोर आल्याचं अल्वारेज यांनी स्पष्ट केलं. ‘यू’ मॅगझीननं आपल्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तसंच, 10 ते 14 वयातील आणि सत्तरीनंतरचा काळ हा सर्वांत कमी आनंदी (Least happiest time) मानला गेला. 10-14 या वयोगटात व्यक्तीमध्ये बरेच शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. टीनएजमध्ये (Teenage) वारंवार येणारे मूड स्विंग वगैरे गोष्टींमुळे हा काळ माणसांसाठी सर्वांत कमी आनंदी ठरतो. तसंच, सत्तरीनंतर आयुष्यात काही बाकी नसणं, इच्छा असूनही बऱ्याच गोष्टींसाठी शरीरानी साथ न देणं, प्रकृती बिघडत राहणं अशा गोष्टींमुळे माणूस दुःखी होत जातो. यामुळेच हा काळ अगदी कमी आनंदी असल्याचं अभ्यासात समोर आलं. आनंदी असण्याचा काळ असू शकतो कमी-अधिक अल्वारेज म्हणतात की, अगदी आकडेवारीनुसार 35व्या वर्षापासूनच लोक कमी आनंदी होऊ लागतात असं नाही. अभ्यासात काही लोकांचा अगदी आनंदी असण्याचा काळ (Happiest period of life) चार वर्षे होता, तर काही लोकांसाठी तो अगदी दहा ते वीस वर्षेही राहिला. तिशीत आनंदी असण्याची कारणं पंचविशीनंतर साधारणपणे बरेच लोक नोकरी वा व्यवसाय करू लागतात. तसंच, याच काळात बऱ्याच जणांची लग्नंही होतात. 25 ते 35 या वयोगटामध्ये (People are happiest in their thirties) कित्येक लोक नोकरी-लग्न करून सेटल झालेले असतात, तसंच त्यांना मुलंही झालेली असतात. आयुष्यातील सर्वोच्च अशा आनंद देणाऱ्या या गोष्टी याच वयोगटात घडतात. त्यामुळे त्या काळात जरी ताण-तणाव असला, कामाचं प्रेशर असलं; तरी पन्नाशीनंतर मागे वळून पाहताना, ‘तोच आपल्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा काळ होता,’ असं या रिसर्चमधील बहुतांश लोकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.