Home /News /lifestyle /

Corona Updates: पूर्णपणे लसीकरण होऊनही कोरोना झालेल्यांमध्ये लगेचच दिसतात ही 2 लक्षणं; असं तपासा

Corona Updates: पूर्णपणे लसीकरण होऊनही कोरोना झालेल्यांमध्ये लगेचच दिसतात ही 2 लक्षणं; असं तपासा

आम्‍ही तुम्‍हाला कोरोनाच्‍या सुरुवातीच्या दोन लक्षणांबद्दल सांगणार आहोत (Early Signs of Covid 19 in Vaccinated People). जी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना झाल्यावर त्यांच्यात दिसतात.

    नवी दिल्ली 08 मे : चीनसह अनेक आशियाई देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा (4th Wave of Coronavirus) धोका वाढत आहे. भारतातही कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये किंचित परंतु सातत्याने वाढ होत आहे. अशा वेळी शरीरातील कोणत्याही बदलाकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आम्‍ही तुम्‍हाला कोरोनाच्‍या सुरुवातीच्या दोन लक्षणांबद्दल सांगणार आहोत (Early Signs of Covid 19 in Vaccinated People). जी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना कोरोना झाल्यावर त्यांच्यात दिसतात. नॉर्वेच्या अभ्यासानुसार, ओमायक्रॉन ब्रेकआउट दरम्यान एका पार्टीत 177 पाहुणे उपस्थित होते. या पार्टीत सहभागी झालेल्या पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना संसर्ग झाल्यावर आठ प्रमुख लक्षणं दिसली. असं आढळून आलं की 66 जणांना कोरोनाची लागण झाली आणि 15 संभाव्य रुग्ण होते. 111 पैकी 89 टक्के लोकांना mRNA लसीचे दोन्ही डोस मिळालेले होते चीनमध्ये कोरोनाचा कहर; 21 कोटी लोक घरांमध्ये कैद, 73 वर्षांत पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये कोविडची 8 प्रमुख लक्षणं कोणती आहेत? खोकला सर्दी थकवा घसा खवखवणे डोकेदुखी स्नायू दुखणे ताप शिंकणे जर्मनीत एका दिवसात सापडले जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण; इतर देशांचे असे आहेत हाल आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, थकवा, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे ही दोन वेगवेगळी लक्षणं आहेत, जी संसर्ग झाल्यावर पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसू शकतात. यामध्ये व्यक्तीला स्नायू दुखणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. डोकेदुखी आणि अगदी अंधुक दृष्टी तसंच भूक न लागल्यामुळे शारीरिक वेदना जाणवतात. त्याचवेळी, पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे हे कोरोना संसर्गाचं आणखी एक लक्षण आहे. शक्यतो ते Omicron चं लक्षण असू शकतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona patient, Corona updates

    पुढील बातम्या