Home /News /videsh /

चीनमध्ये कोरोनाचा कहर; 21 कोटी लोक घरांमध्ये कैद, 73 वर्षांत पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

चीनमध्ये कोरोनाचा कहर; 21 कोटी लोक घरांमध्ये कैद, 73 वर्षांत पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

देशातली 26 शहरं पूर्णपणे बंद असल्यामुळे देशाच्या 22 टक्के जीडीपीवर (China GDP) परिणाम होत आहे. या शहरांमध्ये चीनची राजधानी बीजिंग आणि देशाची आर्थिक राजधानी शांघायचाही समावेश आहे

वुहान 03मे : 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन (Labour Day) म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा चक्क कम्युनिस्ट चीनमध्येच (Labour Day in China) हा दिवस साजरा केला गेला नाही. याला कारण ठरलं कोरोना! चीनमध्ये कोरोनाचा कहर (Corona Crisis in China) पुन्हा वाढला आहे. देशातल्या 26 शहरांमध्ये अगदी कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. यामुळे तब्बल 21 कोटी नागरिक आपापल्या घरांमध्ये एक प्रकारे कैद (Lockdown in China) झाले आहेत. त्यामुळे चीनमधलं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. जर्मनीत एका दिवसात सापडले जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण; इतर देशांचे असे आहेत हाल देशातली कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत असूनही, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी याबाबत जनतेशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात जिनपिंग यांनी कित्येक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाषण केलं; मात्र या सगळ्यात त्यांनी कोरोना आणि लॉकडाउनचा (China Lockdown) विषय सफाईदारपणे टाळला. विशेष म्हणजे, जिनपिंग यांनी देशाच्या नागरिकांना टीव्हीवरूनही संबोधित केलं नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (Communist Party China) वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागू नये यासाठी जिनपिंग कोरोनाबाबत बोलणं टाळत आहेत. देशातली 26 शहरं पूर्णपणे बंद असल्यामुळे देशाच्या 22 टक्के जीडीपीवर (China GDP) परिणाम होत आहे. या शहरांमध्ये चीनची राजधानी बीजिंग आणि देशाची आर्थिक राजधानी शांघायचाही समावेश आहे. एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार, चीनचं मॅन्युफॅक्चरिंग आउटपुटदेखील गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांत कमी राहिलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाच्या एकूण 1126 लाख कोटी जीडीपीपैकी 247 लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट सस्पेंड करणारी 'ही' भारतीय वंशाची महिला एलॉन मस्कच्या टार्गेटवर चीनच्या कित्येक शहरांमध्ये अगदी खाण्या-पिण्याच्या गोष्टींसाठीदेखील नागरिकांना सरकारी मदतीवर (China Covid crisis) अवलंबून राहावं लागत आहे. जिलिन, शांघाय, बीजिंग यांसोबत आठ प्रांतांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून शाळाही बंद (Schools in China) आहेत. जिनपिंग सरकारने या आठ प्रांतांमधल्या लहान मुलांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुलांना घरातून घेऊन जाऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिनपिंग कोरोनाबाबत काही संबोधन करत नसले, तरी त्याबाबत कार्यवाही मात्र सुरू आहे. सुरुवातीला सुमारे 75 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मदत कार्यासाठी करण्यात आली; मात्र हे कर्मचारीदेखील कमी पडत असल्यामुळे जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या सुमारे 50 लाख कार्यकर्त्यांनाही याच कामासाठी मैदानात उतरवलं आहे.
First published:

Tags: China, Corona spread

पुढील बातम्या