जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डायबिटिजसोबत अनेक त्रासांपासून मिळेल आराम, फक्त दुधात मिसळून प्या हा पदार्थ

डायबिटिजसोबत अनेक त्रासांपासून मिळेल आराम, फक्त दुधात मिसळून प्या हा पदार्थ

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपाय

काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेऊ शकता आणि त्याचसोबत तुम्हाला आणखीही काही फायदे मिळतील. यासाठी तुम्हाला दुधात एक पदार्थ मिसळून प्यावे लागेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 नोव्हेंबर : हल्ली आपण आपल्या तब्येतीची बऱ्यापैकी काळजी घेतो. पण वेळेअभावी प्रत्येकाला हे जमतेच असे नाही. उत्तम आरोग्या साठी नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी झोप महत्वाची असते. असे न केल्यास आपल्याला अनेक आजार होण्याचा धोका वाढतो. बीपी, डायबिटीज , हृदयाशी निगडित समस्या हल्ली खूप सामान्य झाल्या आहेत. डायबिटीज तर हल्ली कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. म्हणूनच जर तुम्हाला डायबिटीजची समस्या असेल आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेऊ इच्छित असाल. तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेऊ शकता आणि त्याचसोबत तुम्हाला आणखीही काही फायदे मिळतील. यासाठी तुम्हाला दुधात एक पदार्थ मिसळून प्यावे लागेल. पाहा तो कोणता पदार्थ आहे.

तुम्ही कधी ग्रीन कॉफी प्यायलात? लोकांना वेड लावणाऱ्या या कॉफीचे फायदे वाचून थक्क व्हाल!

दुधात मिसळून प्या हे पावडर ज्या लोकांना मधुमेहा आहे त्यांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यांचा आपल्या शरीराला फायदा होतो. तसेच तुम्ही दूध पिताना त्यामध्ये जर जवसाच्या बियांची पदर टाकली. तर हे मिश्रण अजूनच फायदेशीर होऊ शकते. कारण जवसाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, प्रोटीन, लोह, झिंक, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् असे अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात.

News18लोकमत
News18लोकमत

दुधात जवसाची पावडर टाकून पिण्याचे फायदे मधुमेहासाठी फायदेशीर : जवसामध्ये साखर आणि कॅलरीजही खूप कमी असतात, त्यामुळे मधुमेहात त्याचे सेवन योग्य मानले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी फ्लेक्ससीड फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. सांधेदुखी : वाढत्या वयासोबत सांधेदुखीचा त्रास होणंही सामान्य आहे. काही लोकांना हिवाळ्यात थंडीमुळेही हा त्रास होऊ शकतो. या त्रासावरही दूध आणि जवसाचे मिश्रण उपयुक्त आहे. कारण दुधामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तर त्यात जवस पावडर मिसळल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढेल. पचनक्रिया सुधारते : दुधात जवस पावडर टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि लूज मोशनची समस्या दूर होते.

Cooking Oil : कॅन्सर, डायबिटीज अशा अनेक आजारांना दूर ठेवते हे तेल; स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय

वेदनेपासून आराम : झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रात्री झोपण्यापूर्वी जवसाची पावडर दुधात मिसळून प्यायल्यास शरीरातील नसांना आराम मिळतो. ज्यामुळे शरीरातील वेदनाही कमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात