Research: आता न घाबरता रोज प्या चहा, कारण...

Research: आता न घाबरता रोज प्या चहा, कारण...

आतापर्यंत तुम्हाला चहा पिण्यामुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेकांनी सांगितलं असेल. पण तुम्हाला चहा पिण्याचे फायदे माहीत आहेत का..

  • Share this:

आतापर्यंत तुम्हाला चहा पिण्यामुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल अनेकांनी सांगितलं असेल. पण तुम्हाला चहा पिण्याचे फायदे माहीत आहेत का.. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात चहा प्यायल्याने मेंदू तल्लख होतो आणि काम करण्याची कार्यक्षमता वाढते हे सिद्ध झालं आहे. सकाळी उठल्यावर चहा प्यायल्यावर अधिक ताजं तवानं वाटतं. मात्र रिसर्चमध्ये खुलासा केला की चहा पिणाऱ्यांमध्ये चर्चा करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक चांगली असते. चहा पिण्याचे इतर फायदे जाणून घेऊ.

नॅशनल युनिवर्सिटी ऑफ सिंगापुरचे (National University of Singapore) प्राध्यापक फेंग ली (Feng Lei) यांनी या शोधमध्ये सांगितलं की, चहा प्यायल्याने मेंदूच्या संरचनेवर सकारात्मक परिणाम होतो. त्याचसोबत फेंग यांनी सुचवले की, नियमितपणे चहा प्यायल्यास मेंदूत वृद्धाची लक्षणं फार उशीरा दिसू लागतात.

रिसर्चमध्ये हेही समोर आलं की, जे लोक सकाळी उठल्यावर चहा पितात ते कोणत्याही कामावर अधिक चांगल्याप्रकारे लक्ष केंद्रीत करू शकतात. तसेच निर्णय घेण्याची त्यांची क्षमता इतरांपेक्षा चांगली असते. या संदर्भात संशोधकांनी जर्नल एजिंगमध्ये प्रकाशित केलेल्या स्टडीचा बारकाईने अभ्यास केला. तसेच सतत चहा प्यायल्याने बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

फ्लाइटसारख्या सीट आणि ऑटोमॅटिक डोअर, कोकणात जाणाऱ्या या गाडीचे पाहा INSIDE PHOTO

ही आहे जगातील सर्वात मोठी कंपनी, एका मिनिटाचं उत्पन्न आहे 15 कोटींपेक्षा जास्त

या 5 सवयींवरून कळेल तुमचं नातं टिकणार की नाही

अमित शहांचं भाषण सुरू असताना 'पंकजा मुंडे सीएम सीएम'च्या घोषणा, पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: October 9, 2019, 7:14 AM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading