जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे छोट्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. आज आपण अशाच कंपन्यांबद्दल जाणून घेऊ ज्या प्रत्येक मिनिटाला अब्जावधींची कमाई करतात.
2/ 6
पाचव्या स्थानावर चीनच्या चायना कन्स्ट्रक्शन बँकेचं नाव घेतलं जातं. CCB प्रत्येक मिनिटांला 52.14 लाख आणि दिवसभरात 7.50 अब्ज रुपयांची कमाई करते.
3/ 6
या यादीत चौथ्या स्थानावर दक्षिण कोरयाची कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिकचं नाव येतं. सॅमसंग कंपनी प्रत्येक मिनिटाला 54.03 लाख रुपये आणि दिवसभरात 7.78 अब्ज रुपयांची कमाई करते.
4/ 6
प्रत्येक मिनिटाला सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावल इंडस्ट्रियन अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाचं नाव आहे. ही बँक प्रत्येक मिनिटाला 66.95 लाख रुपये आणि दिवसभरात 8.77 अब्ज रुपयांची कमाई करते.
5/ 6
दुनियातील सर्वात श्रीमंत कंपन्यांमध्ये अॅपल ही कंपनीही येते. एका मिनिटात अॅपल कंपनी 80.63 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते. याशिवाय दिवसभरात ी कंपनी 11.16 अब्ज रुपयांची कमाई करते.
6/ 6
एका मिनिटात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपनींच्या यादीत अग्रणी आहे ती सौदी अरबची अरामको नावाची कंपनी. एका दिवसात ही कंपनी जवळपास 21.58 अब्ज रुपयांची कमाई करते. एवढंच नाही तर एका मिनिटांत ही कंपनी 15 कोटींपेक्षा जास्तची कमाई करते.