तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सीटच्या वर एक फ्लॅश लाइट असते. याशिवाय ऑटोमॅटिक डोअर, अटेंडन्ट बटन, गँगवे वर हाय डेफिनेशन कॅमेरे अशा सुविधा दिल्या गेल्या आहेत.
2/ 5
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना मुव्हिंग टॉकिजची सुविधा, फायर स्मोक डिटेक्शन अलार्म, ऑटोमॅटिक डस्टबिन, ट्रेनचा वेग, स्टॉपेज आणि पुढील स्टेशनची येणारी वेळ दाखवण्यासाठी एलसीडीची सुविधा देण्यात आली आहे.
3/ 5
कोकणात जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसचं चेअर कारचं तिकीट साधारणपणे हजार रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय एग्झिक्यूटीव्ह चेअर कारची तिकीटही दीड हजारांहून जास्त आहे.
4/ 5
IRCTC च्या मते, दिल्ली- लखनऊ तेजस एक्सप्रेसच्या प्रवाशांना 25 लाख रुपयांचा रेल्वे यात्रा विमा मोफत मिळेल. तसेच प्रवाशादरम्यान चोरी झाल्यात प्रवाशांना 1 लाख रुपयांचा प्रवास विमा देण्याची तयारीही दाखवली आहे.
5/ 5
एवढंच नाही तर ट्रेन एक तास उशीरा पोहोचली तर 100 रुपये आणि दोन तास उशीरा पोहोचली तर 200 रुपये प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येतील. तसेच दोन तासांहून ट्रेन उशीरा पोहोचली तर ही रक्कम वाढून 250 रुपये होते.