मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Alart! मोबाईलचा रात्री वापर टाळा; होतील दुष्परिणाम

Alart! मोबाईलचा रात्री वापर टाळा; होतील दुष्परिणाम

दिवसभर फोन वापरून पुन्हा रात्री झोपतानाही फोन हाता घेतला जातो.

दिवसभर फोन वापरून पुन्हा रात्री झोपतानाही फोन हाता घेतला जातो.

मोबाईलशिवाय चैन पडत नाही असे आपल्या आजुबाजूला कितीतरी जण असतील. दिवसभर फोन वापरून पुन्हा रात्री झोपतानाही फोन हाता घेतला जातो. पण, स्मार्टफोन (Smartphone)च्या वापराचे दुष्परिणाम माहीत आहे का?

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 15 मे : आधुनिक काळात मोबाईल, कॉम्युटर, लॅपटॉप यांचा वापर आयुष्याचा एक भाग झाला आहे. लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलच्या (Mobile) अधीन झालेले दिसतात. मग कधी गाणी ऐकण्यासाठी तर कधी गेम खेळण्यासाठी तर कित्येकांच्या प्रोफेशनची गरज म्हणूनही तासन तास फोनवर बोलावं लागतं.

सध्या मोबाईल हा जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे. आपल्या देशात करोडो लोक मोबाईल वापरतात.  मोबाईल हातात घेतल्यशिवाय अनेक जणांची सकाळही होत नाही. डिव्हीइसच्या (Device) वापराची सवय लागल्याने मोबाईलशिवाय चैन पडत नाही असे आपल्या आजुबाजूला कितीतरी जण असतील. दिवसभर फोन वापरून पुन्हा रात्री झोपतानाही फोन हाता घेतला जातो.

(सुंदर होणार मी...; लक्षवेधी दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी केली Plastic Surgery)

पण, स्मार्टफोन (Smartphone)च्या वापराचे दुष्परिणाम अनेक आहेत. अनेक काम सोपी करणारा फोन अतिवापरामुळे घातक ठरतोय (Excessive use of Phone is Dangerous). त्यातही रात्री लाईट बंद करुन फोन बघत बसणाऱ्यांनातर, गंभीर परिणाम भोगायला लागतात.

(आईच्या उपचारासाठी Plasma हवा होता, तरुणाला ऑनलाइन प्रतिसादही मिळाला पण...)

डीडब्ल्यू (DW)च्या रिपोर्ट संदर्भात टीव्ही 9 च्या हवाल्याने हे वृत्त समोर आलं आहे. रात्री स्मार्टफोन वापरल्याने आपल्या झोपेवर परिणाम होतो. रिसर्च (Research) नुसार मोबाईल फोनमधून बाहेर पडणाऱ्या तरंगांमुळे डोळ्यांवर आणि हार्मोन्स (Harmon’s) वर परिणाम होतो. त्यामुळे शरीर रिलॅक्स (Relax) होऊ शकत नाही. त्यामुळेच झोपेवर परिणाम होतो. झोपेचा कालावधी कमी होतो.

DWने यासाठी दोन जुळ्या बहिणींच्या रोजच्या मोबाईल वापराच्या सवयीचा अभ्यास केला. या दोघी बहिणींपैकी एक बहीण रोज रात्री पुस्तक वाचत झोपायची आणि दुसरी बहीण झोपताना फोन बघत असायची. त्यामुळे झोपेच्या सवय़ींवर परिणाम झाला होतो. पुस्तक वाचणाऱ्या मुलीची झोप पूर्ण होत होती. तर, दुसऱ्या बहिणीची झोप कमी झाली होती.

(कोरोनामुळं काय दिवस आले? टीव्हीवर झळकणारे कलाकार विकतायेत रस्त्यावर भाजी)

त्यावरून असा निष्कर्ष निघाला की झोपताना फोन बघणाऱ्यांची झोप कमी होते. याशिवाय मोबाईलच्या अतिवापराने थकवा येणे, एकाग्रता कमी होणे, चक्कर येणे, मळमळणे, तसंच पोट बिघडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मोबाईलच्या उच्च तापमानाचा डोळ्यांवरही परिणाम होतो. एक्सिस मॅग्नेटीक पावरमुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा मोतीबिंदूसारखे विकारही होण्याची शक्यता असते.

रात्री चांगली झोप न आल्याने लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते. रात्री झोपताना फोन बघण्याची सवय असणाऱ्यांनी फोन सेटिंग बदलून लाईट कमी करावा.

First published:

Tags: Lifestyle, Mobile Phone, Research, Smartphones