मराठी बातम्या /बातम्या /देश /

Plasma साठीच्या ऑनलाइन आवाहनाला मिळाला प्रतिसाद; पण... आईच्या उपचारासाठी झटणाऱ्या तरुणाची वाईट फसवणूक

Plasma साठीच्या ऑनलाइन आवाहनाला मिळाला प्रतिसाद; पण... आईच्या उपचारासाठी झटणाऱ्या तरुणाची वाईट फसवणूक

Covid-19 च्या अवघड काळात माणुसकीचीही परीक्षा पाहिली जाते आहे. आईच्या उपचारासाठी तातडीने Blood Plasma हवं आहे, असं आवाहन एका तरुणाने सोशल मीडियावर केलं. ऑनलाइन आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्याला एकाने फोन केला आणि...

डेहराडून, 15 मे :देशातील अनेक राज्यांत कोरोनाचा (Corona)कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन,व्हेन्टिलेटर बेडस, प्लाझ्मा आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या स्थितीचा काही जण गैरफायदा घेऊन रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करताना दिसत आहेत. अशीच फसवणुकीची एक घटना (Man in Dehradun Duped After Raising SOS for Plasma) डेहराडून येथे उघडकीस आली.

डेहराडून येथील एक 30 वर्षीय तरुण आपल्या कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आईकरिता प्लाझ्मा (Plasma) मिळवण्याच्या प्रयत्नात असताना त्याची अर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

कार्तिक सिंग यांनी गुरुवारी प्लाझ्मा डोनेशनबाबत एक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना शुक्रवारी फोन केला. मी तुम्हाला प्लाझ्माची व्यवस्था करुन देतो परंतु, त्यासाठी पैसे लागतील असे त्या व्यक्तीने कार्तिक यांना सांगितले. आईची स्थिती बघता हताश झालेल्या कार्तिक सिंग यांनी गुगल पेव्दारे 2500 रुपयांची मागणी करणाऱ्या त्या व्यक्तीचं म्हणणं मान्य केलं. कार्तिक सिंग यांनी सांगितलं की माझ्याकडे आधीच पैसे कमी होते. त्यामुळे मी त्या व्यक्तीला 300 रुपये दिले. परंतु, जास्त पैसे द्यावेत, असा आग्रह त्या व्यक्तीनं धरला.

TV शोमध्ये दिली सावत्र भावावरील प्रेमाची कबुली, आता दोघं करतायंत एकमेकांना डेट

दरम्यान, एसओएस मेसेजमध्ये (SOS Message) आपला फोन क्रमांक का बदललास अशी विचारणा कार्तिक यांच्याकडे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने केली. याबाबत काहीच कल्पना नसलेल्या कार्तिक सिंग यांच्या लक्षात आले की त्यांनी पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये एक वेगळाच फोन क्रमांक आला आहे. मला फसवणुकीची शंका आल्याने मी तातडीने पोलिसांशी (Police)संपर्क साधल्याचे कार्तिक सिंग यांनी सांगितले.

ऑक्सिजन सिलिंडरच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी; लेकीवर ओढावला भीषण प्रसंग

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधत प्लाझ्माची गरज असल्याचे भासवले आणि त्यास भेटण्यास सांगितले. हा आरोपी गुरु सजन सिंग असल्याची खात्री पटताच पोलिसांनी घटनास्थळीच त्याला अटक केली आणि त्याचा मोबाईल जप्त केला. सिंग यांनी आपल्या एसओएस मेसेजमध्ये शेअर केलेला फोन क्रमांक आरोपीने बदलत तिथे आपला मोबाईल क्रमांक टाकला आणि तो सोशल मिडीया ग्रुप वर (Social Media Group)प्रसारित केला. त्यामुळे डोनर्स साजनशी संपर्क करुन प्लाझा देण्यासाठी तयार आहोत असे सांगायचे आणि साजन या प्लाझ्मासाठी सिंग यांच्याकडे पैश्यांची मागणी करायचा,अशी ही गुन्हाची पध्दत होती.

याबाबात सब-इन्स्पेक्टर महावीर सजवान यांनी सांगितले,की आरोपींना शुक्रवारी भारतीय दंड संहितेच्या विविध कलम आणि साथीचे रोग कायद्याच्या कलम 3 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता असेच बनावट एसओएस संदेश त्यांच्या हाती लागले आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Online crime, SOS, Uttarakhand