मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कोरोनामुळं काय दिवस आले? टीव्हीवर झळकणारे कलाकार विकतायेत रस्त्यावर भाजी

कोरोनामुळं काय दिवस आले? टीव्हीवर झळकणारे कलाकार विकतायेत रस्त्यावर भाजी

काही मालिकांचं किंवा चित्रपटांचं राज्याबाहेर चित्रिकरण सुरू असलं तरीही सेट वरचं युनिट कमी करण्यात आलं आहे. शासनाने कमीत कमी माणसांमध्ये चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे इतर कलाकार व सेट वरील काम करणारी मंडळी पूर्णपणे बेरोजगार झाली आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News Digital

मुंबई 15 मे :  सध्या राज्यात लॉकडाउन (Lockdown)  सुरू आहे तर चित्रिकरणावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर चित्रनगरी मुंबई मध्ये अनेक मालिका तसेच चित्रपटांच शुटींग चालतं. पण आता निर्बंधांमुळे काही मालिका या परराज्यात हलवण्यात आल्या तर काहींच शुटींगच बंद आहे. यामुळे अनेक लहान मोठ्या कलाकारांवर (Junior artists) सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

काही मालिकांचं किंवा चित्रपटांचं राज्याबाहेर चित्रिकरण सुरू असलं तरीही सेट वरचं युनिट कमी करण्यात आलं आहे. शासनाने कमीत कमी माणसांमध्ये चित्रिकरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे इतर कलाकार व सेट वरील काम करणारी मंडळी पूर्णपणे बेरोजगार झाली आहेत.

आजतक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काही या लहान कलाकारांनी आपली व्यथा मांडली आहे.  भावना ही ज्युनिअर आर्टिस्ट सध्या चौकीदाराचं काम शोधत आहे. 37 वर्षिय भावना गेल्या 15 वर्षांपासून ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून चित्रपटांत काम करत आहे. ‘तिस मार खान’, ‘अग्निपथ’, ‘गजनी’, ‘स्लमडॉग करोडपती’ अशा अनेक 200 हून अधिक चित्रपटांत तिने काम केलं आहे. पण लॉकडाउन मुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भावना ही एकटी आई असून तिला एक मुल देखिल आहे. मागील वर्षीच तिच्या पतीचं निधन झालं आहे. तर आपल्या आईसोबत ती राहते.

ओळखा पाहू आई-बाबांसोबत ही चुमकली आहे कोण? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री

घराची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच असून चित्रिकरण बंद असल्याने घराचं भाडं देखिल भरू शकत नसल्याचं तिने म्हटलं आहे. युनियनने मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे पण अजून काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला मदत नको तर काम सुरू करा असं तिने म्हटलं आहे.

पुढे आणखीही काही कलाकारांनी तसेच सेट वर काम करणाऱ्या कामगारांनी आपली व्यथा मांडली आहे. 45 वर्षिय अहमजद ने आपल्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. तर रमजान मध्ये आपम मित्राच्या फळांच्या गाडीवर फळं विकल्याचंही तो म्हटलां. तर चाळीतील घराचं भाडं देण्यासाठीही पैसे नसल्याचं त्याने सांगितलं.

याशिवाय अनेकांनी मदत नको तर काम सुरू करा अशी मागणी केली आहे. ‘महिला कलाकार असोसिएशन’च्या लक्ष्मी यांनी सांगितले की, मागच्या लॉकडाउन वेळी अनेकांनी आम्हाला मदत केली होती. पण यावेळी मात्र कोणीचं मदतीसाठी पुढे येत नाही. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ चे प्रेसिडेंट बी एन तिवारी यांनी सांगितले की भीकेत मिळालेल्या गोष्टीतून कितीदिवस त्यांच पोट भरणार. त्यासाठी जमेल तसं काम सुरू करा. कारण तोपर्यत समस्या सुटणार नाही.

First published:

Tags: Entertainment, Lockdown