बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये नेहमीच सुंदर दिसण्यासाठी चढाओढ सुरु असते. अनेक अभिनेत्री यासाठी प्लास्टिक सर्जरीचं सुद्धा पर्याय निवडतात. मात्र काहींना ते सूट होतं. तर काहींचा चेहरा पूर्णच बदलून जातो. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री आयेशा टाकिया आपल्या सुरुवातीच्या अल्बम आणि चित्रपटांमध्ये खुपचं सुंदर दिसत होती. मात्र नंतर तिने आपल्या ओठांची सर्जरी करून घेतली. आणि त्यामुळे तिचा चेहरा पूर्णच बिघडला आहे.
बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राचा सुद्धा यात समावेश होतो. प्रियांकाने आपल्या नाकाची सर्जरी करून घेतली होती.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुद्धा आपल्या नाकाची सर्जरी करून घेतली आहे. तिच्या सुरुवातीच्या चित्रपटांत आणि आत्ता असलेल्या फोटों,ध्ये बरच फरक दिसून येतो.
अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा आपल्या ओठांची आणि नाकाची सर्जरी करून घेतली आहे. पीके चित्रपटाच्या वेळी तिच्यामधील हा फरक पहिल्यांदा समोर आला होता.
हॉट अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या मल्लिका शेरावतनेसुद्धा, अजून बोल्ड दिसण्यासाठी आपल्या नाकाची आणि ब्रेस्टची सर्जरी करून घेतली होती.
बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने सुद्धा आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. तिनेसुद्धा आपल्या नाकाची आणि ब्रेस्टची सर्जरी करून घेतली आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सारा खानने सुद्धा आपल्या ओठांची सर्जरी करून घेतली आहे. मात्र त्यामुळे तिचा चेहरा खुपचं वेगळा दिसत आहे.