जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उन्हाळ्यात फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची चूक करू नका; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स नाहक मागे लागतील

उन्हाळ्यात फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची चूक करू नका; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स नाहक मागे लागतील

उन्हाळ्यात फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याची चूक करू नका; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स नाहक मागे लागतील

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले थंडगार पाणी तुम्हीही पिता का? जर उत्तर होय असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमची ही सवय नकळत तुम्हाला लठ्ठपणाशिवाय इतर अनेक आजारांना बळी पाडू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मे : थंड पाणी किंवा थंड पेये तुमच्या रक्तवाहिन्या संकुचित करून तुमच्या पचन प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. याशिवाय पचनक्रियेदरम्यान पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेतही अडथळा निर्माण करतात. शरीराचे सामान्य तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते, परंतु जेव्हा तुम्ही काही कमी तापमानाचं खाता-पिता तेव्हा तुमचे शरीर या तापमानाचे नियमन करण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करून त्याची भरपाई करते. ही अतिरिक्त ऊर्जा जी सध्या तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते ती मुळात पचन आणि पोषकद्रव्ये शोषून घेण्याच्या प्रक्रियेत वापरली जाते. यामुळेच पाणी नेहमी खोलीच्या तापमानावर ठेवून पिण्याचा सल्ला दिला जातो. रेफ्रिजरेटरचे पाणी पिल्याने आरोग्यास हानी पोहोचते - लठ्ठपणा- हिंदुस्थान टाईम्स ने दिलेल्या बातमीनुसार, थंड पाण्यामुळे तुमच्या शरीरात साठलेली चरबी घट्ट होते, त्यामुळे चरबी जाळण्यात समस्या निर्माण होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर थंड पाणी पिऊ नका. कमीतकमी थंड पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितके गरम किंवा सामान्य पाणी प्या. गरम पाणी तुमच्या शरीरातील चरबी सहज काढून टाकू शकते. पचन खराब - जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात, बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ, पोट फुगणे यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. जेव्हा थंड पाणी शरीरात जाते तेव्हा ते शरीराच्या तापमानाशी जुळत नाही. अशा परिस्थितीत थंड पाणी शरीरात पोहोचते आणि पोटात असलेले अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता- फ्रीजमधील थंडगार पाणी प्यायल्याने मोठे आतडे आकुंचन पावतात, त्यामुळे आतडे आपले काम नीट करू शकत नाही. मोठ्या आतड्याच्या खराब कार्यामुळे, व्यक्तीचे पोट साफ होत नाही आणि त्याला बद्धकोष्ठतेची त्रास सुरू होतो. घसा खवखवणे- फ्रीजमधलं थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवल्याचंही तुम्ही बहुतेक लोकांना ऐकलं असेल. लक्षात ठेवा की जास्त थंड पाणी पिणे कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे त्यांना घसा खवखवणे, खोकला किंवा इतर कोणत्याही संसर्गाचा त्रास होऊ शकतो. हे वाचा -  या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; प्रशासनाने उचललं मोठं पाऊल डोकेदुखी आणि सायनसचा त्रास - जास्त थंड प्यायल्याने ‘ब्रेन फ्रीझ’ची समस्या उद्भवू शकते. बर्फाचे पाणी पिल्याने किंवा जास्त आईस्क्रीम खाल्ल्याने ही समस्या उद्भवते. यामध्ये थंड पाणी मणक्याच्या संवेदनशील नसांना थंड करते, त्याचा मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे पुढे डोकेदुखी आणि सायनुसायटिस होऊ शकते. हृदय गती कमी - आपल्या शरीरात एक व्हॅगस मज्जातंतू आहे. जो मानेद्वारे हृदय, फुफ्फुस आणि पाचन तंत्र नियंत्रित करते. तुम्ही जास्त थंड पाणी प्यायले तर नसा जलद थंड होतात आणि हृदयाचे ठोके आणि नाडीची गती कमी होते. यामुळे हृदयाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. हे वाचा -  शरीरात रक्तवाढीसाठी या तीन गोष्टी ठरतील रामबाण, आहारात करा सामील ऊर्जा पातळी खाली थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि शरीरात जास्त काम करण्याची क्षमता राहत नाही. खरं तर थंड पाणी शरीरातून चरबी सोडू शकत नाही, ज्यामुळे शरीर सुस्त राहते आणि ऊर्जा पातळी खाली जाते. पाणी कसे प्यावे उन्हाळ्यात, गरम किंवा कोमट पाणी पिण्याऐवजी आपण खोलीच्या तपमानावर किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिऊ शकता. यामुळे तुमची तहानही भागेल आणि तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही. एरव्ही ऋतुमध्ये कोमट पाणी प्यावे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात