नवी दिल्ली, 13 मार्च : बदलत्या जीवनशैलीमुळे (Life Style) विविध आजार होण्याचा धोका वाढला आहे. वाढत्या वयासोबत आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी अनेक जण व्यायामावर (Exercise) भर देतात. व्यायामामुळे आरोग्य तर चांगलं राहतंच; पण आयुष्यमानही वाढतं. अनेक जण रोजच्या व्यायामात चालणं, पळणं, सायकलिंग यांसारख्या प्रकारांचा समावेश करतात. काही जण वेट ट्रेनिंग (Weight Training) करण्यावर भर देतात. वेट ट्रेनिंग केल्यानं मृत्यूचा धोका कमी होतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. वेट ट्रेनिंगचे अनेक फायदे आहेत. याविषयीची माहिती आज तक ने प्रसिद्ध केली आहे. अलीकडच्या काळात फिटनेसवर (Fitness) भर वाढला आहे. फिटनेससाठी व्यायाम हा उत्तम समजला जातो. एकूण आरोग्यासाठी चालणं, पळणं, सायकलिंगसारखे मीडियम इंटेन्सिटीचे एरोबिक्स (Aerobics) सर्वोत्तम मानले जातात. ज्या व्यक्ती नियमित एरोबिक एक्सरसाइज करतात आणि अॅक्टिव्ह राहतात, त्यांचं आयुष्यमान वाढतं, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. तसंच त्यांना कॅन्सर, डायबेटिस, हार्टशी संबंधित आजार (Disease) होण्याचा धोकाही कमी असतो. त्याचप्रमाणे दुसरीकडे काही जण वेट ट्रेनिंगवर भर देतात. काही जण पीळदार स्नायूंसाठी हा व्यायाम करतात; मात्र या व्यतिरिक्त त्याचे आणखीही अनेक फायदे आहेत. वेट ट्रेनिंग एक्सरसाइज केल्यानं क्षमता (Capacity) आणि ताकद (Strength) वाढते. यात प्रामुख्याने वजन उचलण्याचा व्यायाम केला जातो. यात कॅलिस्थेनिक्स, आयसोमेट्रिक्स आणि प्लायोमेट्रिक्स यांसारख्या प्रकारांचाही समावेश होतो; मात्र हा व्यायाम जिममध्ये अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. वेट ट्रेनिंगच्या फायद्याविषयी एक संशोधन करण्यात आलं. Independent.UKने दिलेल्या माहितीनुसार, हे संशोधन जपानमधल्या (Japan) तीन विद्यापीठांच्या संशोधन पथकानं केलं. या संशोधनात प्रामुख्याने पश्चिमी युरोपियन नागरिक किंवा उत्तर अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते. ज्यांनी स्वतःबद्दल योग्य माहिती दिली, त्या व्यक्तींवर या अभ्यासाचा डाटा अवलंबून आहे. संशोधनानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती व्यायाम करते तेव्हा तिच्या शरीरात मायकोइन्स नावाचं हॉर्मोन (Hormones) रिलीज होतं. हे हॉर्मोन मेटाबॉलिझम, लिव्हर, मेंदू आणि किडनीचं काम सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करतं. मायकोइनचा आणखी प्रकार असतो, त्याला मायोस्टॅटिन असं म्हणतात. यामुळे स्नायूंचा आकार कायम राहतो. चयापचय क्रिया वाढते. फॅटी सेल्सचं प्रमाण कमी होतं. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते आणि मृत्यूचा धोकाही कमी होऊ शकतो. हे वाचा - फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना तपासा या गोष्टी या संशोधनात त्यांनी 16 वेगवेगळ्या अभ्यासांतल्या डेटाचं मूल्यमापन केलं आणि त्यावर निष्कर्ष काढताना दावा केला, की वेट ट्रेनिंग केल्यानं अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. दर आठवड्याला 30 ते 60 मिनिटं वेट ट्रेनिंग केल्यास मृत्यूचा धोका 10 ते 20 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दर आठवड्याला तीन तासांपेक्षा जास्त वेट ट्रेनिंग केल्यास मृत्यूचा धोका 10 टक्क्यांनी वाढू शकतो. हे वाचा - रात्री झोपेत तुमचंही तोंड कोरडं पडतं का? या गोष्टी वेळेवर करायला विसरू नका जेव्हा आजारांपासून बचाव करण्याचा विचार येतो तेव्हा वेट ट्रेनिंग करण्याची क्षमताही बदलू शकते. उदाहरण द्यायचं झालं, तर दर आठवड्याला 40 ते 60 मिनिटं वेट ट्रेनिंग केल्यास हार्ट डिसीजचा धोका कमी होतो. तसंच 30 ते 60 मिनिटं हा व्यायाम केल्यास मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. वेट ट्रेनिंगचा काही विशिष्ट अवयवांचे कर्करोग, जसं की आतडे, मूत्रपिंड आदींच्या जोखमीवर कोणताही परिणाम होत नाही. या संशोधनात जे निष्कर्ष समोर आले आहेत ते मुख्यत्वे राष्ट्रीय आरोग्य सेवेने (NHS) शिफारस केलेल्या व्यायामाच्या अनुषंगाने आहेत. `एनएचएस`च्या म्हणण्यानुसार, 19 ते 64 वर्षं वयादरम्यानच्या व्यक्तींनी दर आठवड्याला किमान दोन वेळा वेट ट्रेनिंग करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.