जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तासंतास कम्प्युटरसमोर बसून काम करताय? नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी

तासंतास कम्प्युटरसमोर बसून काम करताय? नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी

तासंतास कम्प्युटरसमोर बसून काम करताय? नुकसान टाळण्यासाठी अशी घ्या डोळ्यांची काळजी

नोकऱ्यांमुळे लोकांचा स्क्रीनचा वापर वाढलाय. तर स्मार्टफोनचे व्यसनही वाढत आहे. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे अस्पष्ट दृष्टी (Poor Eyesite) आणि कमकुवत दृष्टीचा त्रास वाढत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : स्मार्टफोन आणि लॅपटॉप हे आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनले आहेत. आपल्यापैकी बरेच जण हल्ली लॅपटॉप आणि संगणक (Excess Use Of Screens) वापरून घरून किंवा ऑफिसमध्ये काम करतात आणि स्मार्टफोन तर हल्ली सर्वचजण वापरतात. नोकऱ्यांमुळे लोकांचा स्क्रीनचा वापर वाढलाय. तर स्मार्टफोनचे व्यसनही वाढत आहे. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे अस्पष्ट दृष्टी (Poor Eyesite) आणि कमकुवत दृष्टीचा त्रास वाढत आहे. संगणक आणि स्मार्टफोनच्या स्क्रीनचा डोळ्यांवर घातक (Side Effect Of Using More Screens) परिणाम होऊ शकतो. सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर जीन ट्वेंज यांनी शोधून काढले आहे की स्मार्टफोनच्या निळ्या प्रकाशामुळे निद्रानाश (Insomnia) होऊ शकतो. नेत्ररोग तज्ञांच्या मते, स्मार्टफोनच्या व्यसनामुळे डोळ्यांशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवतात. तज्ञ काय म्हणतात? दिल्लीतील बजाज आय केअर सेंटरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. राजीव बजाज (Ophthalmologist Dr. Rajiv Bajaj) म्हणतात की, अनेक तास स्क्रीनवर लक्ष केंद्रित केल्याने डोळ्यांवर ताण येतो. संगणकाच्या जास्त वापरामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (Computer Vision Syndrome) म्हणतात. संगणकाच्या पडद्यावर काम करणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये अशा समस्या दिसतात. जी मुले कार्टून पाहतात आणि स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर गेम खेळतात त्यांनाही या समस्येचा सामना करावा लागतो.

पावसाळ्यात कपड्यांचा दुर्गंध कसा घालवाल? या आहेत सोप्या टिप्स

डॉ बजाज यांच्या मते, जर तुम्हाला डोळ्यांची समस्या असेल आणि तुम्ही स्क्रीन वापरताना योग्य चष्मा (Right Glasses For Eyes) लावला नाही. तर तुमची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्क्रीनच्या अतिवापरामुळे अंधुक दिसणे, डोळ्यांत कोरडेपणा, डोळ्यांत जळजळ, डोकेदुखी किंवा मान दुखणे अशा समस्या उद्भवतात.

Red Sandalwood Benefits : मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

डोळ्यांच्या समस्या कशा टाळाव्यात नेत्रतज्ज्ञांच्या मते, मुलांनी जास्त वेळ स्क्रीनकडे पाहू नये. जर तुम्ही ऑफिसमध्ये जास्त तास काम करत असाल तर कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घ्यावा. 20 मिनिटे काम केल्यानंतर, 20 सेकंदांचा ब्रेक घ्या आणि या दरम्यान तुमच्या पापण्या 20 वेळा मिचकावा. डोळ्यांमध्ये कोरडेपणा आल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर तीन महिन्यांनी नेत्रतपासणीकेली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात