मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कितीही खाल्लं-प्यायलं तरी होत नाही समाधान; वारंवार लागणाऱ्या तहान-भुकेचा झोपेशी आहे संबंध

कितीही खाल्लं-प्यायलं तरी होत नाही समाधान; वारंवार लागणाऱ्या तहान-भुकेचा झोपेशी आहे संबंध

झोपेच्या कमतरतेमुळे अनेकांना रोजचे काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि तब्येत बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या शरीराला झोपेची कमतरता भासत असेल ते कोणते संकेत देते.

झोपेच्या कमतरतेमुळे अनेकांना रोजचे काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि तब्येत बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या शरीराला झोपेची कमतरता भासत असेल ते कोणते संकेत देते.

झोपेच्या कमतरतेमुळे अनेकांना रोजचे काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि तब्येत बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुमच्या शरीराला झोपेची कमतरता भासत असेल ते कोणते संकेत देते.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 11 जुलै : काही लोकांना वाटते की झोपल्याने त्यांचा वेळ वाया जातो. या वेळेत ते त्यांची अनेक कामे करू शकतात. म्हणजे त्यांच्या या वेळेचा सदुपयोग करतात. बरेच लोक झोपेला यशाचा शत्रू मानतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्हाला योग्य किंवा पूर्ण झोप (Lack Of Sleep) मिळाली नाही. तर तुमच्या शरीराला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. वास्तविक अनेक वेळा लोकांना नीट झोप येत नाही आणि काही लोक काम, तणाव किंवा इतर कारणांमुळे झोप टाळणे सुरू करतात. असेही बरेच लोक आहेत ज्यांची झोप पूर्ण होत नाही. परंतु ते या गोष्टीकडे अनावश्यक म्हणून दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुमच्या शरीराला जास्त झोपेची गरज असते. तेव्हा तुमचे शरीर काही सिग्नल्स (Side Effect Of Less Sleeping) द्यायला सुरुवात करते. ज्यावरून आपल्याला कळते की, आपल्या शरीराला पुरेशा झोपेची गरज आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने (Insufficient Sleep Disadvantages) तुमचे आरोग्य बिघडू शकते. मानसशास्त्रज्ञ डॉ. जेन अँडर्स (Psychologist Dr. Jane Anders) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टला कॅप्शन दिले, 'तुम्हाला झोपण्याच्या वेळी किंवा तुम्ही थकलेले असताना आणि रात्री 9 वाजताच झोपायला गेल्यावर दोषी किंवा असुरक्षित वाटते का? अशा प्रकारे आपले शरीर आपल्याला सांगत असते की, त्याला काय आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण अशा संस्कृतीचा भाग आहोत, जिथे लोकांना करण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. तर 7-9 तासांची झोप ही लक्झरी आणि आळसाचे लक्षण मानले जाते. मात्र शरीराच्या गरजा समजून घेत आणि आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याचे महत्त्व समजावून सांगताना जेन अँडरने अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या दर्शवतात की आपल्याला अधिक झोपण्याची गरज आहे. झोपेच्या कमतरतेची लक्षणं (Symptoms Of Sleep Deprivation) - जर तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल. तर तुम्हाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. - तुम्हाला सतत काहीतरी खावेसे वाटते का? वारंवार खाणे किंवा अनहेल्दी फूड खाण्याची इच्छा होणे. हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या दिनचर्येत अधिक झोपेची गरज आहे. मासिक पाळी वेळेवर येत नाही? दुर्लक्ष करू नका, गर्भधारणेदरम्यान येऊ शकतात अडथळे - जर तुम्ही रात्री उशीरा झोपत असाल आणि सकाळी तुम्हाला लवकर जावे लागत असेल तरीदेखील तुम्हाला जास्त झोपेची गरज असते. - जर तुम्हाला नेहमी डिहायड्रेशनचा त्रास होत असेल किंवा तुमची तहान शमत नसेल तर तुम्हाला जास्त झोपेची गरज आहे. - जर तुम्हाला कॅफिनची सवय लागली असले आणि तुम्ही स्वतःला त्यापासून लांब ठेऊ शकत नसाल. तर तुम्हाला झोपेची नितांत गरज आहे. - जर तुम्हाला दररोज आराम करण्यासाठी अल्कोहोलची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Clothes Drying Tips : पावसाळ्यातही कपडे सुकवण्याचं आता नो टेन्शन; या सोप्या पद्धतीने झटपट वाळतील तुमचे शरीर तुम्हाला हे सर्व सिग्नल देत असेल. तर तुम्ही तुमची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही या बाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकता.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Sleep

पुढील बातम्या