Home /News /lifestyle /

Clothes Drying Tips : पावसाळ्यातही कपडे सुकवण्याचं आता नो टेन्शन; या सोप्या पद्धतीने झटपट वाळतील

Clothes Drying Tips : पावसाळ्यातही कपडे सुकवण्याचं आता नो टेन्शन; या सोप्या पद्धतीने झटपट वाळतील

बाहेर पाऊस सुरु असताना कपडे कुठे वळत घालावे हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण बाहेर पाऊस असतो आणि घरात कपडे वळवले तरी त्याला आंबट वास लागतो आणि कपड्यांना दुर्गंधी येते.

  मुंबई, 5 जुलै : पावसाळ्यात पावसाचा काही अंदाजच नसतो. कधी खूप थोडा थोडा पाऊस येतो. नाहीतर काही सारखा पाऊस सुरु असतो. पावसाळा (Rainy Season) सर्वांना आवडतोच मात्र पावसाळ्यात (Monsoon Tips) सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे कपडे सुकवण्याचे. बाहेर पाऊस सुरु असताना कपडे कुठे वळत घालावे हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण बाहेर पाऊस असतो आणि घरात कपडे वळवले तरी त्याला आंबट वास लागतो आणि कपड्यांना दुर्गंधी येते. तसेच त्यामध्ये जंतूही तयार होतात. मात्र आज आम्ही तुम्हाला या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत. याद्वारे पावसाळ्यातही तुम्हाला तुमचे कपडे (How To Dry Clothes During Rain) व्यवस्थित सुकवता येतील. फॅनचा वापर करा पावसाळ्यात घराबाहेर कपडे सुकवणे अनेकदा शक्य होत नाही. तेव्हा घरात कपडे सुकवावे लागतात. अशावेळी कपडे व्यवस्थित पिळून त्यातून शक्य तितके जास्त पाणी काढून घ्या आणि ते घरात वळत घाला आणि घराचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवा. यामुळे घर ओलसर होणार नाही. तसेच कपडे लवकर सुकवण्यासाठी घरातील पंखादेखील (Dry Clothes Under Fan) सुरु ठेवा.

  फळांसोबत चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; शरीरासाठी अपायकारक असतात अशी Food Combination

  वॉशिंग मशीन ड्रायरमध्ये कपडे सुकवा पावसाळ्यात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचा प्रयत्न करा. कारण मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर ते ड्रायरमध्ये (Use Washing Machine Dryer) सुकवता येतात. ड्रायरमध्ये कपड्यांमधून बरेच पाणी निघून जाते त्यामुळे ते बऱ्याचअंशी वळतात आणि नंतर कमी वेळात कोरडे होतात. क्लोथ स्टॅण्ड किंवा हॅंगरचा वापर करा कपडे सुकवण्यासाठी क्लोथ स्टॅण्ड (Use Cloth Stand) आणि हॅंगरचा वापर करा. जण याचा वापर करतात. यामुळे जास्त कपडे एकाचवेळी वळवले शकतात. कपड्यांमधून व्यवस्थितपणे पाणी काढून घ्या आणि नंतर या स्टॅण्डवर कपडे वळत घाला. आयर्नचा वापर करा इस्त्री म्हणजेच आयर्नचा (Use Iron) वापर करा. कपड्यातून व्यवस्थित पाणी काढून टाकल्यानंतर या कपड्यांना इस्त्री करा. कमी टेम्परेचरवरच काड्यांना इस्त्री करा. इस्त्री जास्त गरम झाल्यास ती बंद करा आणि थोडा वेळाने पुन्हा सुरु करा.

  तुम्हालाही लांब केस आवडतात? दैनंदिन सवयींमध्ये करा थोडा बदल, लांब केसांचं स्वप्न होईल पूर्ण

  हेअर ड्रायर वापरा कपडे सुकवण्याचा अजून एक मार्ग म्हणजे हेअर ड्रायर. घरीच कपडे सुकवायचे असतील किंवा तुम्ही कुठे प्रवासात असलात तरीदेखील हेअर ड्रायर (Use Hair Dryer) हा कपडे सुकवण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र हेअर ड्रायर पातळ किंवा माध्यम जाडीचे कपडे सुकवण्यासाठी उपयुक्त आहे. जास्त जाड कापण्यासाठी हे हवे तसे काम करणार नाही.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Monsoon, Rain

  पुढील बातम्या