मुंबई, 5 जुलै : केस आपले सौंदर्य वाढवण्याचे काम करत असतात. सुंदर आणि लांब केस (Long Hair) कोणाला नाही आवडत ? परंतु सर्वांचेच केस असे लांब आणि सुंदर नसतात. लांब केस हवे असतील तर आपल्याला खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपल्या आहारावर नियंत्रण (Diet) ठेवावे लागते, योग्य व्यायाम (Exercise) करावा लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे झोप. झोपेच्या वेळा पाळणे (Sleep Timing) हेदेखील केसांसाठी खूप गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्वाच्या गोष्टींविषयी सांगणार आहोत. ज्या केल्यास तुमचेही लांब केसांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. केसांसाठी सर्वात महत्वाची असते मालिश. केसांची नियमित मालिश (Hair Massage) केल्यास केसांना संपूर्ण पोषण मिळते. यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा आपल्या केसांची मालिश शकता. असे केल्यास तुमच्या केसांची वाढ कुठेच थांबणार नाही तर तुमचे केस हळू हळू वाढायला लागती. त्याचबरोबर मालिश केल्यामुळे तुमच्या स्कॅल्पला पुरेसा रक्तपुरवठा होते. यानेदेखील तुमचे केस वाढण्यास मदत होईल.
Vastu Tips: घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभकेसांच्या वाढीसाठी केसांना पुरेसे पोषण मिळणे खूप गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला आपल्या आहाराकडे नीट लक्ष द्यावे लागते. पौष्टिक अन्न घेणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्हाला काही पदार्थ खाणे (Avoid Fast Food) टाळावेदेखील लागते. तुम्हाला लांब केस हवे असतील तर तुम्हाला मसाल्याचे (Avoid Oily Food) पदार्थ खाणे टाळावे लागेल. तुमच्या केसांची वाढ थांबू शकते. त्यामुळे तेलकट, मसाल्याचे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार केसांना पुरेसे पोषण मिळण्यासाठी शरीरात पाण्याची (Drink Water) पातळी योग्य राखणेदेखील गरजेचे असते. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, कमी पाणी पिल्यामुळे तुमच्या केसांची वाढ थांबू शकते. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता येऊ देऊ नका आणि भरपूर पाणी प्या.