• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • भूक लागली म्हणून कधीही काहीही खाणं पडेल महागात; 'हे' 8 पदार्थ तर विशिष्ट वेळेलाच खा

भूक लागली म्हणून कधीही काहीही खाणं पडेल महागात; 'हे' 8 पदार्थ तर विशिष्ट वेळेलाच खा

दिवसा भात खाल्ल्यामुळे आपले मेटाबॉलिझम वाढतं.

दिवसा भात खाल्ल्यामुळे आपले मेटाबॉलिझम वाढतं.

आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थ चुकीच्यावेळी खाण्याचे दुष्परिणाम (Side Effect) भोगावे लागतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : भूक लागली की आपण काहीही खातो पण, प्रत्येक पदार्थ खाण्यासाठी एक ठराविक (Specific Time to Eat Foods) वेळ असते. ही वेळ पाळली नाही तर पोटाचे गंभीर त्रास (Stomach Infection) व्हायला लागतात. चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ (Wrong Food) खाल्ल्यामुळे जळजळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, उलटी, लूज मोशन्स असे त्रास व्हायला लागतात. हे त्रास टाळण्यासाठी ते पदार्थ खाण्याची योग्य वेळ (Time) पाळायला हवी. याशिवाय चुकीचे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे (Food Combination) देखील पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच पाहूयात कुठला पदार्थ कोणत्या वेळी खायला हवा. भात लोक कोणत्याही वेळी भात खातात. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश असतोच. मात्र दिवसा भात खाल्ल्यामुळे आपले मेटाबॉलिझम वाढतं. त्यामुळेच दुपारच्या वेळी भात खाणं योग्य असतं. रात्रीच्या वेळी भात खायचा असेल तर, झोपण्याच्या 2 तास आधी खायला हवं. (बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर सर्वात प्रभावी; अँटिबायोटिक औषधांपेक्षाही आईचं दूध भारी) केळ खाण्याची योग्य वेळ केळं दुपारी खाणं योग्य असतं. कारण रिकाम्यापोटी केळं खाल्ल्यामुळे जळजळ आणि अपचन होऊ शकतं. रिकाम्या पोटी केळं खाल्ल्यास ॲसिडिटी वाढते आणि पोटदुखी होते तर, रात्रीच्या वेळी केळं खाल्ल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. अक्रोड खाण्याची वेळ अक्रोड मेंदूसाठी उत्तम मानले जातात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. पण, आक्रोड संध्याकाळच्या वेळी खाणं योग्य असतं. दुपारी किंवा रात्रीच्या वेळी अक्रोड खाल्लं तर, त्याचा जास्त परिणाम मिळत नाही. (ओठ चावण्याच्या सवयीकडे नको दुर्लक्ष; घातक आजाराचं आहे लक्षण) दूध पिण्याची योग्य वेळ लोक शक्यतो सकाळच्या वेळी दूध पितात. मात्र, रात्रीच्या वेळी दूध पिणं जास्त फायदेशीर आहे. यामुळे शरीराला आराम मिळतो. शिवाय दिवसभरात जालेली झीज भरून निघून झोपही चांगली लागते. सकाळच्या वेळी दूध घेतलं तर, पचायला अवघड ठरतं. स्प्राऊट खाण्याची वेळ वजन कमी करण्यासाठी स्प्राऊट खाल्ले जातात. मात्र, स्प्राऊट रात्रीच्या वेळी खायला हवेत. कारण, ते पचायला हलके असतात आणि शरीराला पोषण देतात. सकाळच्यावेळी स्प्राऊट खाल्ल्यामुळे लवकर पचल्यामुळे भूक जास्त लागते. दही आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळच्या वेळी दही खायला हवं. शिवाय दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळी तीन ते चार वाजता दही खाऊ शकता. यामुळे पचन वाढतं. पोटामध्ये गूड बॅक्टरिया निर्माण होतात. मात्र, रात्रीच्या वेळी दही खाल्ल्यामुळे सर्दी-खोकला होऊ शकतो. (अंडं खाऊन फेकू नका कवच; लांबसडक केसांसाठी तयार करा हेयर मास्क) सफरचंद इम्युनिटी सिस्टम मजबूत करण्यासाठी सफरचंद खाणं आवश्यक आहे. सफरचंदाच्या सालीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. पण, रात्रीच्या वेळी सफरचंद खाल्लं तर, ॲसिडिटी होते. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी सफरचंद खावं. (हा 12 वर्षांचा मुलगा गेल्या 10 वर्षापासून खातोय फक्त ब्रेड आणि फ्रूट योगर्ट) मटण खाण्याची वेळ मटण दिवसा खावं कारण, मटणामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात. प्रोटीनमुळे शरीराची ताकद वाढत असली तरी, पचायला जड असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी मटण खाल्लं तर, पोट दुखू शकतं किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
  Published by:News18 Desk
  First published: